कला गुणांना वाव देणारा जेसीआय अकोटचा हळदी कुंकू कार्यक्रम

0
1639

आकोट/ ता.प्रतीनिधी

स्थानिक नरसिंग मंदिर प्रांगणात जेसीआय अकोट जेसीरेटविंग द्वारा आगळा वेगळा हळदी कुंकवाचा कार्यक्रम दि. 20 जाने.रोजी संपन्न झाला .
कार्यक्रमाला प्रमुख अतीथी डॉ. रुजुता राजगुरु या होत्या.यावेळी उपस्थीत महिलांना त्यांनी मौलीक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला अकोट शहरातील जवळपास तिन हजार महिलांनी उपस्थीती दर्शवली. वाण म्हणुन श्री सिदधीविनायक हॉस्पीटल प्रायोजीत श्री गजानन महाराजांची सुंदर फोटो फ्रेम प्रत्येक महिलांना भेट देण्यात आल्या.

या हळदी कुंकू कार्यक्रमाचे वैशिष्ट् म्हणजे गृहउदयोगाला चालणा देण्याकरिता कार्यक्रम स्थळी कुरोळी ,खारोळी, पापड, तांदुळ कुरोळी, लोणचे ,साबूदाना कुरोळी व असंख्य प्रकारचे घरगुती पदार्थांची प्रदर्शनी व विक्री उपलब्ध होती . त्यामुळे हया माध्यमातुन महीलांच्या गृहउदयोगाला चालणा मिळाली असुन महिलांन मध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.फोटो फ्रेमींग मध्ये डिजीटल फोटो फ्रेमींगची प्रदर्शनी लावण्यात आली होती, तर वैभव बायोटेक च्या वतीने फुल झाडांचा स्टॉल आर्कषित व सुगंधित करित होता.

अरुणाताई खोडके यांनी गांजर,बोर, ऊस, वटाणा, गहु,तीळ, गुड आणी पुष्प , रांगोळी यांच्या संगमातुन कार्यक्रमाची शोभा वाढवणारी खुप सुंदर अशि नैसर्गीक रांगोळी काढुन उपस्थीतांचे मने जींकली .खास बालकांन करीता आगपेटीच्या काडयांन पासुन कलाकृती बनविण्याची स्पर्धा ठेवण्यात आली होती. हया स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक मैथिली बाळे, दवी्तीय क्रमांक रीध्दी चांडक व प्रोत्साहन पर साहील चापके, खुशी मालानी, श्रावणी मेंढे यांनी बक्षिसे पटकावली तसेच लकी ड्रॉ मध्ये विजेताचा मान स्मीता मिसाळ यांना मिळाला.

जेसिरेट पास्ट् चेअरपर्सन ममता टावरी व स्मीता चावडा यांनी यावेळी नाटीका सादर केली. कार्यक्रमात मंचावर आगमन पुजा मिरकुटे, संचालन जेसिरेट चेअर पर्सन दिपाली कडु प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख् डॉ सोनल व्यव्हारे, सह प्रकल्प् प्रमुख मंगला गणोरकार, आस्थापठण पुनम भिरडे ,शुभेच्छा पर संदेश अध्याय प्रथम महिला ममता हाडोळे, अतिथी परिचय अर्चना भोरे, डॉ रोहीत व्यव्यहारे यांचा परिचय डॉ रुपाली भुजबिळे यांनी दिला. तर आभार प्रदर्शन वैशाली शेगोकार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता स्वाती वासे, वैशाली हाडोळे, प्रीती बनसोड, वंदना झाडे, छाया शेळके, रष्मी अडोकार, पुनम भिरडे, संगीता सुने, भावना जोशी, मंजु ठाकुर, ज्योती बुधवत, रेखा वर्मा, रेखा बोबळे, भागयाश्री दिंडोकार, गव्हाने ताई, कविता राठी, विदया गटटाणी, विदया मीरकुटे, राजश्री गणोरकार, मायाताई इंगळे, स्वरा व्यव्हारे , चांडक ताई,प्रज्ञां घाटोळ,शुभांगी पिंपळे, मिनाताई शेगोकार, अरुणाताई खोडके,शारदाताई लहाने, शितलताई लहाने, सुषमाताई झाडे, रजनीताई पवार, राजश्रीताई बाळे

,मंजुशा पांडे, अर्चना पिंपळे, वंदना गोगटे, वंदना व्यवहारे, वर्षा लकडे, पल्लवी म्हैसने, निलम टावरी, सोनिया गटटाणी, पायल मारु, स्नेहा दुबे, आशा हीरूळकर,किरण मावदे, कल्याणी शेगोकार, शारदा वर्मा, रंजना वसु,ज्योती बोडखे, विनिता हाडोळे यांनी परिश्रम घेतले.
जेसिआय अकोट चे अध्यक्ष निलेश हाडोळे, सचिव संदिप चांडक, अंचल उपाध्यक्ष प्रशांत खोडके,अंचल अधिकारी अशोक गटटाणी,बिपिन टावरी, तथा जेसीआय चे पुर्वाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थीत होते.