कोंडमधील तीन अवैद्य दारुविक्रेत्यावर ढोकी पोलिसांची धडक कार्यवाही

0
1187
Google search engine
Google search engine

कोंडमधील तीन अवैद्य दारुविक्रेत्यावर ढोकी पोलिसांची धडक कार्यवाही

उस्मानाबाद / प्रतिनिधी- उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथील आवैद्य दारु विक्री करणार्या दारुविक्रेत्यावर ता ३०/१/२०१९ रोजी ढोकी पोलिसांनी धाडी मारुन त्यांना अटक केली आहे.
कोंड येथील अवैद्य हातभट्टी /देशी / विदेशी दारुची विक्री होत असल्याची माहीती ढोकी पोलिसांना समजताच ढोकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणपत जाधव यांनी पोलिसांचा फौजफाटा घेऊन कोंड येथील दारुविक्री करत असलेल्या तीन ठिकाणी धाडी मारून तिघांना ताब्यात घेतले आहे . यात अमोल धोंडिबा जाधव, श्रावण श्रीपती जाधव, विजयकुमार रावसाहेब जावळे या तिघांना ढोकी पोलिसांनी मुद्देमालासह रंगेहात पकडून हि कार्यवाही केली.दरम्यान गावात अशी कार्यवाही आत्तापर्यत एकाही पोलिस अधीकार्यांनी केली नव्हती परंतू हि कार्यवाही ढोकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणपत जाधव यांनी कर्मचार्यांना घेऊन हि कार्यवाही केली. त्यामुळे या कार्यवाहीची कोंडसह परिसरातील गावात मोठी पोलिसांची दहशत निर्माण झाली आहे .ही झालेली कार्यवाही कोंडच्या इतिहासात पहिलीच आसल्याची चर्चा आहे.जधव यांनी गेल्या आठवड्यात दारुबंदी समीतीच्या बैठकित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते ते आश्वासन पूर्ण केले.यापूढे जर कोंडमध्ये कोणी दारु विक्री केली तर त्याच्यावर आम्ही कार्यवाही करू अशी प्रतिक्रीया सहाय्क पोलिस निरिक्षक गणपत जाधव यांनी दिली .या कार्यवाहीत एक खाजगी जिपसह शासकिय पोलिस गाडी व इतर कर्मचारी सोबत यांच्यासह पोलिस कर्मचार्यांनी हि कार्यवाही उस्मानाबाद चे पोलिस अधिकक्षक आर राजा ,अप्पर पोलिस अधिकक्षक स्वाती भोर ,उप विभागीय पोलिस अधीकारी श्री नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक गणपत जाधव ,पोलिस उप निरिक्षक दंडे,पोलिस उप निरिक्षक सरपाळे, पोलिस उप निरिक्षक शिंदे व पोलिस कर्मचारी यांनी हि कार्यवाही केली.