खडकपुरा येथील स्वस्त धान्य दुकानदार आधार कार्ड सत्यापनाचे नागरिकांकडून घेतोय पैसे – नगरसेवक वानरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार

0
1297
Google search engine
Google search engine
तत्काळ कारवाई करा, अन्यथा जनआंदोलन
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
     शहरातील खडकपुरा येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानदार आधार्ड कार्ड सत्यापनाकरिता शिधापत्रिका धारकांकडून पैसे घेत असुन धारकांना अपमानास्पद वागणुक देऊन धान्य वाटपात गैरव्यवहार करित असल्याची तक्रार नगरसेवक बच्चु वानरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे.
     स्थानिक खडकपुरा परिसरातील वाय. आर. पुडके यांचे स्वस्तभाव शिधावाटप दुकान आहे. सदर दुकानदार शिधापत्रिका धारकांकडून आधार कार्ड सत्यापन करण्याकरिता प्रति व्यक्ती दहा रुपये घेत असून सामान्य गोरगरीब मजुरांची आर्थिक लूट व शोषण करीत आहे. ज्यांनी पैसे दिले नाही त्यांना परत पाठवत असून सदर प्रकारची तोंडी तक्रार पुरवठा निरीक्षक श्री. ढगे यांच्याकडे केल्यानंतर सदर सत्यापणाचे दहा रुपये घेणे बंद केले. मात्र त्यानंतर शिधापत्रिका सत्यापनाचा वेळ दुपारी २ ते ४ एवढा कमी ठेवला. या प्रभागातील जनता मजूरवर्ग असल्यामुळे दिवसा किंवा सायंकाळी आधार कार्ड सत्यापनाला गेले असता सदर दुकानदार वापस पाठवितो. एकाच वेळी गर्दी होत असल्यामुळे ४ वाजता काम न झाल्यामुळे शिधापत्रिकाधारक वापरतो व त्यांची मजुरी सुद्धा पडते. शिधा वाटप दुकानदारा बद्दल या परिसरातील शिधापत्रिकाधारकांच्या भरपूर तक्रारी आहे. कार्डधारकाला घेतलेल्या मालाची बिल न देणे, या व्यतिरिक्त जादा पैसे घेणे, केव्हाही दुकान उघडणे, दुकानात माल स्टॉक असुनही माल नाही म्हणून परत पाठविणे, तसेच दुकानातील धान्य परस्पर बाहेर विकणे व रॉकेल शिधापत्रिका धारकाला कमी देऊन ब्लॅक मध्ये ऑटोवाल्यांना विकणे व शिधापत्रिकाधारकांना नियमानुसार मिळत असलेले धान्य कमी देणे अशा अनेक तक्रारी नागरीकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहे. याशिवाय दुकानातील साठा फलकावर साठ्याबद्दल माहिती लिहत नसुन दर फलक सुध्दा लावण्यात आलेले नाही. दुकानदाराची पत्नी कार्डधारकांसोबत नेहमी वाद करून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याची धमकी देत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच उद्धट बोलून जनतेच्या त्याच्या हक्काच्या घरापासून वंचित ठेवून त्यांचे शोषण करीत आहे. त्यामुळे या दुकानदाराची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा जनआंदोलनाचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतुन दिला आहे. यावेळी नगरसेवक बच्चु वानरे, रामकृष्ण जयसिंगपुरे, शंकरराव वैद्य, पंकज वानरे, लक्ष्मी जयसिंगपुरे, प्रवीण शेंद्रे, मुकिंद उज्जैनकर,  मनीषा उज्जैनकर, शालू अमदुरे, सिमा उज्जैनकर, बेबी शिवणकर,  शांता शिवणकर, नामदेव शिवणकर, मारोतराव राऊत, अशात चामलाटे यांसह अनेक नागरीकांची उपस्थिती होती.