तलाठ्यांच्या हलगर्जीपणामुळे महिला शेतकरी शासकीय अनुदानापासुन वंचित

0
1167

तलाठ्यांच्या हलगर्जीपणामुळे महिला शेतकरी शासकीय अनुदानापासुन वंचित

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार.कामेगांव तलाठी सज्जातील प्रकार.
ऐन दुष्काळात शेतकऱ्यांची क्रुर थट्टा.
सन २०१६ मधील ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरला नाही अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने अनुदान मंजुर केले होते परंतु कामेगाव सज्जाच्या तलाठ्यांच्या हलगर्जीपणामुळे लासोना येथील एका महिला शेतकऱ्याला पात्र असतानाही शासकीय अनुदानापासुन वंचित रहावे लागले.
यापुर्वी याच महिलेच्या शेतात गतवर्षी २ एकर कापसाचे पीकं होते.बोंडअळीमुळे पीक वाया गेले.यावेळेही शासनाने हेक्टरी १३ हजार अनुदान जाहीर केले होते.प्रत्यक्षात खात्यावर १० हजार ४०० रुपये जमा होणे गरजेचे होते.परंतु खात्यावर ५ हजार ४४० रुपयेचं जमा झाले.कापसाच्या अनुदानाबरोबर २०१६ चेही अनुदान जमा होणे गरजेचे होते.याबाबत तलाठ्यांकडे विचारणा केली असता हे अनुदान तुम्हाला मिळु शकणार नाही,निधी संपला,खाते नंबर नव्हता अशी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
कापसाचे अनुदान जमा करतेवेळी तलाठ्यांकडे शेतकऱ्यांचा खाते नंबर होता तर ह्याच अनुदानावेळी कसा नाही ? वारंवार आधारकार्डाची व बँक खात्याची झेरॉक्स प्रत देऊनही शासकीय अनुदानापासुन वंचित ठेवणाऱ्या तलाठ्यांची चौकशी होऊन अनुदानाची रक्कम मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे वेणुबाई गोविंदराव काटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे