शेगाव ब्रेकिंग :- शेगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी, लिपिकास लाच घेताना रंगेहाथ अटक

0
4595
Google search engine
Google search engine

मुख्याधिकारी पंत आणि लिपिक इंगळे ताब्यात

एका खाजगी प्लॉटचे कमर्शियल एन ए करण्यासाठी  लाच स्विकारताना शेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतुल पंत आणि वरिष्ठ लिपिक प्रभार सह्हायक लेखापाल . राघोजी इंगळे यांना बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सकाळी रंगेहात अटक केल्याची माहिती समोर आली आहे  , या कारवाईमुळे शेगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील एका निवासी प्लॉटची वाणिज्य विषयक नोंद करण्यासाठी दस्तवेज पालिकेत सादर करण्यात आले.निवासी प्लॉटची वाणिज्यविषयक नोंद करण्यासाठी सुरूवातीला पाच लक्ष रुपयांची मागणी करण्यात आली अशी तक्रार श्री मोरे यांनी केली . मात्र,  2 लाख ५० हजार ची मागणी वरून  एक लाख २० हजार रक्कम स्वीकारली . याप्रकरणी मुख्याधिकारी अतुल पंत आणि रोखपाल राघोजी इंगळे यांची कसून चौकशी सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सांगितले. या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरली असून, शेगाव पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.