येडशीमध्ये गुणवान विदयार्थाचा सत्कार

0
986
Google search engine
Google search engine

येडशीमध्ये गुणवान विदयार्थाचा सत्कार

येडशी येथील विदयार्थ्यांनी क्रिडा स्पर्धा , बुद्धिमत्ता आणि विज्ञान प्रदर्शनात चमकदार कामगिरी केल्याबद्दल त्यांचा रविवारी ( दि. ३ ) सत्कार करन्यात आला. हा सत्कार हजरत जमादार बाबा वेल्फेअर सोसायटीच्या वतीने करण्यात आला. कुस्ती व वेटलिफ्टिग स्पर्धत कु. नेहा पीरपाशा शेख, स्कॉलरशीपमध्ये अरशद अस्लम पटेल आणि विज्ञान प्रदर्शनात कु. शायना इसामुद्दीन पटेल यांनी यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रफिक पटेल, उपाध्यक्ष सल्लाउद्दीन शेख, सचिव हैदर पटेल, लतीफ शेख, जब्बार पटेल, मौलाना अमजद पटेल, अखिल शेख, इम्रान पटेल, वसीम तांबोळी, तौफिक पटेल, अमीर शेख, पीरपाशा शेख, इसामुद्दीन पटेल, जावेद शेख, सुलतान पटेल, आलीम मुजावर, मजहर पटेल, सुलतान पिंजारी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.