आकोटच्या ज्युनियर अनिल कपूर आरिफ खानची लोकलाइक फेडरेशन अध्यक्ष पदी निवड!

0
1247
Google search engine
Google search engine

अकोट/ता.प्रतिनिधी
शहरातील जूनियर अनिल कपूर आरिफ खान हे १९९१ पासून बॉलीवुड च्या कलाकार सोबत मुंबई व इतर शहरामध्ये आपल्या गुणांच्या जोरावर आपली कला सादर करतात. नुकतीच त्यांची सर्वसंमतीने लोकलाइक फेडरेशनच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आली असल्याचे कळवण्यात आले आहे. त्यांनी आज पर्यंत आपल्या जीवनामध्ये १५ ते २० फ़िल्म मध्ये मुख्य कलाकार च्या भूमिकेत काम केले आहे तसेच आज पर्यंत स्वदेशात व विदेशात ३००० फ़िल्मी शो व सीरियल मध्ये देखील काम केले आहे आणि विशेष करून विदर्भातील शेतका-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांनी पुकार किसान की ही फ़िल्म स्वत तयार केली आहे याच कार्याच्या जोरावर त्यांना फेडरेशन वेस्टर्न सिने इम्प्लॉयर यांनी त्यांना ऑल इंडिया लोकलाइक फेडरेशन च्या राष्ट्रिय अध्यक्ष पदी सर्व ज्यूनिर कलाकार च्या संमतीने निवड करण्यात आली आहे विशेष म्हणजे १५ १६ फ़रवरीला खलर्स चैनल वर रात्री ९ वाजता नौरंगी रे या कॉमेडी ज्युनियर करणार आहे यावेळी नवनियुक्त राष्ट्रिय अध्यक्ष ज्यूनिर अनिल कपूर आरिफ खान यांनी ज्युनियर कलाकाऱ्यांच्या हितासाठी सदैव काम करणार अशी गवाही त्यांनी दिली.या त्यांची झालेली निवड बद्दल सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.