आकोट न.पा.शाळांचा”बाल महोत्सव- २०१९” चे आयोजन

0
811

शालेय विद्यार्थ्यांचे कलागुणांना वाव देणारा उपक्रम

आकोट/ता.प्रतिनीधी
शालेय विद्यार्थ्यांचे कला गुणांना वाव देणारा “बाल महोत्सव- २०१९” संपन्न होत असून ५ते ९ फेब्रुवारी दरम्यान कल्पतरु विद्या मंदीराचे प्रांगणात प्राथमिक शाळांचे चिमुकले बालक या उपक्रमात सहभागी होत आहेत.

आकोट नगरपरिषदेच्या विद्यमाने आयोजित बाल महोत्सवात खेळ,क्रिडा,ज्ञान-विज्ञान,कला,सांस्कृतिक ,नाट्य,
अभिनय, तथा विविध गुणांचे प्रदर्शन करण्यासाठी पालिका शाळांचे चिमुकले बालकांना संधी मिळणार आहे.मुलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले
आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे यांचे हस्ते शिक्षण सभापती सौ.शशीकला गायगोले यांचे अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.याप्रसंगी पालिकेचे उपाध्यक्ष अबरार खाँ,मुख्यअधिकारी प्रशांत रोडे,माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे,जि .प.चे माजी शिक्षण सभापती राजु बोचे,प्राचार्य वाल्मिक भगत,बांधकाम सभापती सौ.सारिका जेस्वाणी,महिला व बालकल्याण सभापती सौ.नगमा अंजुम शे.अजहर,आरोग्य सभापती मंगेश पटके,पाणी पुरवठा सभापती सौ.रेशमा अंजुम अफजल खाँ,स्थायी समिती सदस्य सौ .विजयाताई दिलिप बोचे,गजानन लोणकर,शिवदास तेलगोटे,
युवा उद्योजक अविनाश डिक्कर,मराठा सेवा संघाचे अध्यक्ष राजेश कुलट तथा सन्मानिय नगरसेवक अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

बाल महोत्सवा अंतर्गत मंगळवार दि.५ ला सांघीक खेळ दि.६ला वैयक्तिक क्रिडा स्पर्धा दि.७ ला अंतिम स्पर्धा व विविध कला स्पर्धा दि.८ला विज्ञान जत्रा ,विज्ञान प्रदर्शनी ,वेशभूषा स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम तथा नाटीका स्पर्धा,दि.९वा विज्ञान मंजुषा व इतर स्पर्धासह समारोप व बक्षिस वितरण असा भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून चिमुकले बालकांत चैतन्य निर्माण झाले आहे.

बाल महोत्सवातील विविध कार्यक्रमाला शिक्षण प्रेमी,पालक तथा नागरिकांनी उपस्थित राहून बालकांचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन पालिकेचे प्रशासन अधिकारी नंदकिशोर हिंगणकर तथा नगरपरिषद शाळांचे मुख्याध्यापक-शिक्षकवृंदांनी केले आहे
————————-

बाल महोत्सवात मुलांना आपले कला गुणांना वाव देणारी संधी उपलब्ध होणार असून हा उपक्रम अभ्यासपूरक आहे.मुलांना बालवयातच विविध कला गुणांना प्रोत्साहन मिळाल्यास त्यांचेतून कलावंत घडतात त्यादृष्टीने बाल महोत्सव उपयुक्त उपक्रम आहे असा विश्वास प्रशासन अधिकारी नंदकिशोर हिंगणकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना केला.त्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले
————————-