“ उस्मानाबाद जिल्हयात जुगार अडयावर छापे 15,050/- रु चा माल जप्त ”

0
754
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद जिल्हयात जुगार अडयावर छापे 15,050/- रु चा माल जप्त

पोलीस स्टेशन ढोकी :- दिनांक 03/02/2019 रोजी 16.15 वा.सु. 1) अशोक कांता क्षिरसागर 2) बाळु विश्वनाथ पांढरे 3) शुक्राचार्य बाबुराव थोरात 4) सुधाकर दामोदर थोरात 5) बाळासाहेब चांगदेव शिंदे 6) राजाभाऊ विठ्ठल भांगे सर्व रा. दाउतपूर ता.जि.उस्मानाबाद हे अशोक कांता क्षिरसागर यांचे इस्त्रीचे दुकानासमोर ग्रामपंचायतीचे गाळयामध्ये दाउतपूर येथे स्वत:चे फायदयासाठी गोलाकार बसून पैशावर तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळुन आले त्यांचे कब्जात तिर्रट जुगाराचे साहित्य, 2 मोबाईल व रोख 1,400/- रु. असा एकुण 3,400/- रु.चा माल मिळुन आला म्हणून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 03/02/2019 रोजी पोलीस स्टेशन ढोकी येथे म.जु.का.चे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन आनंदनगर :- दिनांक 03/02/2019 रोजी 16.50 वा.सु. शिंगोली तांडा येथे 1) सुरेश उर्फ श्रीहरी आंबादास आडे 2) रामदास मोहन पवार 3) रमेश पोमा राठोड 4) राजुदास धनु राठोड 5) वसंत रुपचंद राठोड सर्व रा. शिंगोली तांडा ता.जि.उस्मानाबाद हे बेकायदेशिर रित्या स्वत:चे फायदयासाठी गोलाकार बसून पैशावर तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळुन आले त्यांचे कब्जात तिर्रट जुगाराचे साहित्य, 6 मोबाईल व रोख 650/- रु. असा एकुण 11,650/- रु.चा माल मिळुन आला म्हणून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 03/02/2019 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे म.जु.का.चे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उस्मानाबाद जिल्हयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 114 लोकांवर कारवाई

उस्मानाबाद जिल्हा :- दिनांक 03/01/2019 रोजी एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 114 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी 22 हजार 800 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

उमरगा येथे चोरी

पोलीस स्टेशन उमरगा :- दिनांक 02/02/2019 रोजी 23.00 ते 03/02/2019 रोजी 06.30 वा.चे दरम्यान ओमकार मल्लिकार्जुन कारभारी रा.सदन नगर पतंगे रोड उमरगा यांचे घराचे खोलीच्या दरवाज्याचा कडी कोंडा उचकटुन घरात प्रवेश करुन कपाटाचे लॉक उचकटून कपाटातील 71,000/- रु. रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहे म्हणून ओमकार मल्लिकार्जुन कारभारी यांचे फिर्यादवरुन अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 03/02/2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2

आनाळा ते वाटेफळ रोडवर कारची मोटारसायकलला धडक

पोलीस स्टेशन आंबी :- दिनांक 30/12/2018 रोजी 18.30 वा.सु. 1) राहुल ब्रम्हदेव भांडवलकर 2) अच्युत ब्रम्हदेव भांडवलकर दोघे रा.वाटेफळ ता.परंडा हे मोटारसायाकल क्र. एम.एच. 25 ए.एन. 7562 वरुन वाटेफळ येथे जात असताना आनाळा ते वाटेफळ रोडवर इनगोंदा तलावाजवळ पांढऱ्या रंगाचे कार चालकाने त्याचे ताब्यातील कार ही अतिवेगाने व निष्काळजीपणे चालवून मोटारसायकलला जोराची धडक देवून मोटारसायकलवरील 1) राहुल ब्रम्हदेव भांडवलकर 2) अच्युत ब्रम्हदेव भांडवलकर यांना किरकोळ व गंभीर जखमी करणेस कारणीभुत झाला आहे. व मोटारसायकलचे अंदाजे 10,000/- रु.चे नुकसान केले आहे. व कार न थांबवता तसाच निघुन गेला आहे. वगैरे राहुल ब्रम्हदेव भांडवलकर यांचा फिर्याद जबाब सी.एन.एस.हॉस्पीटल सोलापूर येथुन सलगर वस्ती पो.स्टे.सोलापूर शहर येथे दिलेने व आज रोजी पोलीस स्टेशनला प्राप्त झालेने अज्ञात कारचालकाविरुध्द दिनांक 03/02/2019 रोजी पोलीस स्टेशन आंबी येथे भादंविचे कलम 279,337,338 सह मोवाकाचे कलम 134 (अ)(ब) ,184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एन.एच. 52 रोडवर पारगाव येथे चालत्या ट्रकमध्ये चोरी

पोलीस स्टेशन वाशी :- दिनांक 03/02/2019 रोजी 01.00 ते 01.30 वा.चे दरम्यान पारगाव बायपास एन.एच. 52 रोडवर पारगाव गावचे पुढे फहिमोद्दीन अमिनोद्दीन शेख रा.अमळनेर ता.अमळनेर जि.जळगाव हे चालवत असलेला ट्रक क्र. एम.एच. 18 ए.ए. 9322 चे वर चढून दोन ठिकाणी तापडत्री फाडून कोणीतरी अज्ञात चोरटयाने संतुर साबनाचे 16 बॉक्स किं.अं. 26,880/- रु.चा माल चोरून नेला आहे म्हणून फहिमोद्दीन अमिनोद्दीन शेख यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 03/02/2019 रोजी पोलीस स्टेशन वाशी येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमरगा येथे मागील भांडणाच्या कारणावरून मारहान

पोलीस स्टेशन उमरगा :- दिनांक 31/01/2019 रोजी 14.30 वा.सु. डिग्गी रोड कॉर्नर उमरगा येथे 1) नागेश पाथ्रुड 2) बालाजी पाथ्रुड दोघे रा. काळा मारोती मंदिर पाठीमागे उमरगा 3) पिंटू 4) कृष्णा दोघे रा. झोपडपट्टी उमरगा यांनी ऋषीकेश दिलीप सुरवसे रा.डिग्गी रोड उमरगा याचे नागेश पथ्रुड याचे सोबत झालेल्या मागील भांडणाची कुरापत काढून ऋषीकेश दिलीप सुरवसे यास शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहान केली व बालाजी पाथ्रुड याने हातात दगड घेवून ऋषीकेश सुरवसे यास कपाळावर व उजवे बाजूस डोळयाचे वर मारुन दुखापत केली व सर्व आरोपीतांनी तु लई माजलास, तुला बघतो असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून ऋषीकेश दिलीप सुरवसे यांचे फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 03/02/2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 324,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मौजे किणी येथे खडी केंद्रावर चोरी

पोलीस स्टेशन ढोकी :- दिनांक 02/02/2019 रोजी 23.00 ते दिनांक 03/02/2019 रोजी 05.00 वा.चे दरम्यान मौजे किणी येथे अजमेरा यांचे खडी केंद्रावरील कामकाजासाठी आणलेले केबल आरमाडा चार बंडल एक बंडल 400 मी प्रमाणे किं.अं. 18,000/- रु. असे एकूण 72,000/- रुपयेची व डांबर टाकी कॉक, व ईतर साहित्य अं.किं. 8,000/-रु असे एकूण 80,000/- रु. चा माल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला आहे. म्हणून विरमदेव शिवलाल पारीक रा.राजीव गांधी नगर उस्मानाबाद ता.जि.उस्मानाबाद यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 04/02/2019 रोजी पोलीस स्टेशन ढोकी येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3

उमरगा येथे टमटमची पादचाऱ्यास धडक

पोलीस स्टेशन उमरगा :- दिनांक 31/01/2019 रोजी 02.00 वा.सु. डिग्गी रोड पाण्याचे टाकीजवळ उमरगा येथे अज्ञात टमटम चालक याने त्याचे ताब्यातील टमटम हयगईने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून विकास लिंबाजी सुर्यवंशी रा.बाबळसुर ता.उमरगा यांना जोराची धडक देवून उजवा पाय फॅक्चर होणेस कारणीभुत झाला आहे. वगैरे विकास लिंबाजी सुर्यवंशी यांचे एम.एल.सी.जबाब वरुन दिनांक 03/02/2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 279,338 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमरगा चिवरी शिवारात ट्रॅक्टरची मोटारसायकलला धडक

पोलीस स्टेशन नळदुर्ग :- दिनांक 02/02/2019 रोजी 18.00 वा.सु. उमरगा चिवरी शिवार पांडुरंग शिरगीरे यांचे शेताजवळ गौरव शंकर पाटील रा.आरळी (बु) ता.तुळजापूर हे त्यांची मोटारसायकल क्र. एम.एच. 13 डब्ल्यु 4090 वर जात असताना रामेश्वर तुकाराम शिंदे रा. उमरगा चि. ता.तुळजापूर याने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 ए.एल. 4034 हा भरधाव वेगात हयगईने व निष्काळजीपणे चालवुन गौरव शंकर पाटील याचे मोटारसायकलला जोराची धडक देवून त्यांना गंभीर जखमी करुन न थांबता निघुन गेला म्हणून गौरव शंकर पाटील यांचे फिर्यादवरून रामेश्वर तुकाराम शिंदे याचेविरुध्द दिनांक 03/02/2019 रोजी पोलीस स्टेशन नळदुर्ग येथे भादंविचे कलम 279,337,338 सह मोवाकाचे कलम 184, 134(अ)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मौजे सोनारी येथे महिलेस जबरदस्तीने मो.सा.वर बसवुन नेले गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन आंबी :- दिनांक 03/02/2019 रोजी 15.00 वा.सु. मौजे सोनारी शिवार परंडा येथे पिडीत महिला ही साक्षीदार महिलेच्या शेतात मका डोबण्यासाठी गेली असताना प्रविण बापू शेलार रा.सोनारी ता.परंडा याने पिडीत महिला काम करत असलेल्या शेतात जावून पिडीत महिलेस बोलावून घेवून तिस स्वत:चे मोटारसायकलवर जबरदस्तीने बसवून घेवुन गेला म्हणून पिडीत महिलेच्या पतीच्या फिर्यादवरून प्रविण बापू शेलार याचेविरुध्द दिनांक 04/02/2019 रोजी पोलीस स्टेशन आंबी येथे भादंविचे कलम 365 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उस्मानाबाद येथे किरकोळ कारणावरून मारहान

पोलीस स्टेशन आनंदनगर :- दिनांक 02/02/2019 रोजी रात्री 11.15 वा.सु. सांजा गावाच्या पुढे व जोगेश्वरी हॉटेलच्या अलीकडे पुलावर उस्मानाबाद येथे 1) अशोक रंगनाथ सगट 2) बालाजी अशोक सगट 3) विनोद अशोक सगट 4) उमेश अशोक सगट सर्व रा. काळेवाडी थेरगाव ठाणे पिंपरी चिंचवड पुणे यांनी सुरज पोपट उदारे रा. सारोळा (बु) ता.जि.उस्मानाबाद ह.मु. काळेपडर हडपसर यास माझ्या मुलीस नीट का वागवत नाहीस व आमच्या इकडे येवून का रहात नाहीस असे म्हणून लोखंडी रॉडने , चापटाने व बुक्याने मारहान करुन जखमी केले म्हणून सुरज पोपट उदारे यांचे फिर्यादवरून वरील आरोपीतांविरुध्द दिनांक 04/02/2019 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 324,323,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परंडा येथे मोटारसायकल चोरी

पोलीस स्टेशन परंडा :- दिनांक 05/10/2018 रोजी 15.00 ते 16.00 वा.च्या दरम्यान कोर्ट आवारात परंडा येथून कलीम महामुद पठाण रा.बावची ता.परंडा जि.उस्मानाबाद यांनी गावातील श्रीराम अरुण जाधव रा.बावची ता.परंडा यांची मागुन घेतलेली हिरो कंपनीची काळया रंगाची एच.एफ.डिलक्स मो.सा.नं. एम.एच. 25 ए.एम. 7955 जु.वा.किं.अं. 40,000/- रु.किंमतीची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरटयाने कोर्ट आवारातून चोरुन नेली आहे म्हणून कलीम महामुद पठाण यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 04/02/2019 रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4

तुळजापूर येथे चोरी

पोलीस स्टेशन तुळजापूर :- दिनांक 03/02/2019 रोजीचे 23.30 ते दिनांक 04/02/2019 रोजीचे 09.30 वा.च्या दरम्यान तुळजापूर येथे राजाभाऊ सुधाकर टोले रा.तुळजाभवानी मंदीरजवळ तुळजापूर यांच्या मालकीचे तुळजापूर ते उस्मानाबाद रोडवरील निरंजन धाबा शेजारी असलेले पत्र्याच्या शेडमधील टोले पिजा सेंटरचे कोणीतरी अज्ञात चोरटयाने पाठीमागील लोखंडी पत्र्याचे नटबोल्ट काढून पत्रा उचकटून आतमध्ये प्रवेश करुन, रोख रक्कम 21,700/-रु. व सामान – सामान 1 मोबाईल, 1 होमथेटर, वेपर्स , बिस्कीट , चॉकलेट,कोलड्रिंक्स असा एकूण 44,820/- रु. चा माल चोरून नेला आहे. म्हणून राजाभाऊ सुधाकर टोले यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 04/02/2019 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे भादंविचे कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.