लातूरमध्ये वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह जणजाग्रती मोहिम

225

लातूरमध्ये वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे रस्तासुरक्षा सप्ताह जणजाग्रती मोहिम

उस्मानाबाद /प्रतिनिधी – आज वाहतूक नियंञण शाखा लातूर यांच्या वतीने लातूर शहरात रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान कार्यक्रम घेऊन जणजाग्रती करण्यात आली. वाहन चालवताना घ्यावयाची सुरक्षा व काळजी याबाबत शाळेतील / महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन लातूर शहरात हि जणजाग्रती मोहिम सुरु करून शहरात फेरी काढण्यात आली.या फेरीमध्ये राजर्षी शाहू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसत होता.या विद्यालयाच्या हातामध्ये बोर्ड दिसत होते त्यावर आपली सुरक्षा हिच परिवाराची सुरक्षा ,वेग कमी जिवनाची हमी ,हेल्मेट सिट बेल्ट लगाओ अपनी जान बचाओ , वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळा, वाहानचा वेग कमी ठेवून वाहन चालवा, दारू पिऊन वाहन चालवू नका,क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करू नका,विना लायसनचे वाहन चालवू नका , वाहनामुळे होणारे प्रदुषणावर नियंत्रण ठेवा, सुरक्षित अंतर ठेऊन वाहन चालवा, अशा स्वरूपाचे विद्यार्थ्यांच्या हातामध्ये बोर्ड देऊन हि फेरी काढण्यात आली होती .रस्ता सुरक्षा फेरीची सुरवात हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री संजिव भोर , उप विभागीय पोलिस अधीकारी श्री सचिन सांगळे , वाहतुक शाखेचे पोलिस निरिक्षक श्री गजानन भातलवंडे , लाकाळ, उबाळे व पोलीस कर्मचारी ,शालेय विद्यार्थी , विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.छायाचित्रे

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।