मुकुंदराज विद्यालयात तब्बल तीन दशकानंतर अविस्मरणीय स्नेहमेळावा

0
1491

सांगली जिल्ह्यातील मुकुंदराज विद्यालय शाळगांव ता.कडेगांवयेथे १९८८ सालच्या शालेय विद्यार्थीनींचे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक टी.ए.लाड यांचे शुभहस्ते करण्यात आले.विद्यालयाच्या वतीने सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थीनींचे पुष्प गुच्छ देवुन स्वागत करण्यात आले.प्रास्ताविकात बोलताना शाळेचे मुख्याध्यापक टी ए लाड म्हणाले की,संस्थच्या शतक मोहोत्सवी वर्षात वाॅल कंपाऊंड,सभागृह बांधकाम,सी सी टी व्ही कॅमेरे,डीजिटल क्लासरूम इत्यादी समस्या सोडवण्यासाठी माजी विद्यार्थ्यानी आर्थिक मदतीचा हात भार लावावा असे आवाहन त्यांनी केले.मुकुंदराज विद्यालयाचे माजी विद्यार्थी विद्यार्थीनी १९८८ च्या बॅचचे तीस वर्षांपूर्वी बालमित्रांची झालेली ताटातुट या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने प्रत्येक शालेय मित्र मैत्रिणीसाठी आतुरतेची व संस्मरणिय ठरली. या स्नेहमेळाव्याचे आयोजनासाठी पुणे येथे स्थीत असणारे या शाळेचे माजी विद्यार्थी संजय कमाने,सुरेंद्र करांडे,सतीश पवार,हेमंत मुळीक हे गत दोन वर्षापासुन प्रयत्नशील होते.पंचक्रोशीतुन मुंबई,पुणे,बेंगलोर येथुन खास शालेय माजी विद्यार्थी विद्यार्थीनी मेळाव्यास उपस्थित राहुन शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.या मेळाव्यासाठी शासकीय,खासगी, बांधकाम,शेती,सैन्यदल व मेडीकल इत्यादी क्षेत्रातील ८० पैकी ६० विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.विटा येथिल कल्पना मेडीकलचे मालक सचिन शहा, सुभेदार दिनेश चव्हाण, बांधकाम व्यवसायीक सुर्यकांत क्षिरसागर,सौ.माया जाधव,,रत्ना चव्हाण,माजी सरपंच सुरेश घाडगे, प्रगतशील शेतकरी विकास देशमुख इत्यादी विद्यार्थी विद्यार्थीनींनी शालेय आठवणी व यशस्वी जीवनाचे,परिश्रमाचे महत्व पटवुन सांगीतले.या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी शशिकांत पाटील यांनी मोफत मंडप व साऊंड सिस्टीम उपलब्ध करून दिले कार्यक्रमाचे आभार माजी विद्यार्थी व रयत सेवक शिंदे व्ही.बी.यांनी मानले या कार्यक्रमास राजेंद्र करांडे,अशोक कदम याचेसह विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर यांचे बहुमोल सहकार्य लाभले.वंदेमातरम राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.