उस्मानाबाद पोलीस क्राईम रिपोर्ट

0
1216



उस्मानाबाद जिल्हयात जुगार अडयावर छापे 15,050/- रु चा माल जप्त

पोलीस स्टेशन तुळजापूर :- दिनांक 04/02/2019 रोजी 18.40 वाजता शिराढोण शिवारात 1) डिगांबर उमराव इंगळे रा.अपसिंगा 2) दिलदार अजमौदीन चौगूले रा.अळजापूर ता.बार्शी 3) संभाजी उत्तम मंडलिक रा.भांडेगाव ता.बार्शी 4) बालाजी आप्पासाहेब देशमुख रा.कामठा ता.तुळजापूर 5) शामराव कालीदास रोकडे रा.कामठा ता.तुळजापूर 6) बाबु ठाकरु राठोड रा.उंबरेकोठा उस्मानाबाद 7) सचिन / आण्णासाहेब जयकुमार देशमूख रा.शिराढोण ता.तुळजापूर 8) महादेव रामचंद्र उमरे रा.अळजापूर ता.बार्शी 9) सुधाकर संदीपान कापसे रा.कासारी ता.बार्शी 10) प्रल्हाद किसन गोरे रा. अपसिंगा ता.तुळजापूर 11) प्रविण एकनाथ उमरे रा.अळजापूर ता.बार्शी 12) युवराज बाळासाहेब उमरे रा.अळजापूर ता.बार्शी 13) अभिजीत बिभिषण बोंगाणे रा. मसला ता.तुळजापूर हे शिराढोण शिवारात स्वत:चे फायदयासाठी गोलाकार बसून पैशावर तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळुन आले त्यांचे कब्जात तिर्रट जुगाराचे साहित्य, व 3,28,680/- रु.चे मुद्देमाल व रोख रक्कमेसह मिळुन आले म्हणून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 05/02/2019 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे म.जु.का.चे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उस्मानाबाद जिल्हयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 94 लोकांवर कारवाई

उस्मानाबाद जिल्हा :- दिनांक 04/01/2019 रोजी एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 94 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी 21 हजार 100 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

मौजे सावरगाव येथे किरकोळ कारणावरुन मारहान

पोलीस स्टेशन तामलवाडी :- दिनांक 04/02/2019 रोजी 08.00 वा.सु. मौजे सावरगाव येथे चाँद हुसेन सय्यद रा.सावरगाव ता.तुळजापूर हे शेत मजुरीच्या कामा करिता बहीणीच्या घरासमोर जावून बोलावित असताना 1) निजाम ईन्नुस सय्यद 2) सुरज निजाम सय्यद 3) आजीम निजाम सय्यद सर्व रा. सावरगाव ता.तुळजापूर यांनी संगणमत करुन तु इथे का आलास तु आमचे बरोबर भांडण करणार आहेस का असे म्हणून निजाम ईन्नुस सय्यद याने त्याच्या हातातील स्टम्पने चाँद हुसेन सय्यद यांच्या डोक्यास , कपाळावर मारुन जखमी केले व सुरज निजाम सय्यद याने त्याच्या हातातील काठीने चाँद हुसेन सय्यद यांना मारुन मुक्का मार दिला व आजीम निजाम सय्यद याने लाथाबुक्यानी मारहान केली म्हणून चाँद हुसेन सय्यद यांचे फिर्यादवरुन वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 04/02/2019 रोजी पोलीस स्टेशन तामलवाडी येथे भादंविचे कलम 324,323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2

मौजे नांदुरी येथे मोटारसायकल चोरी

पोलीस स्टेशन तामलवाडी :- दिनांक 01/02/2019 रोजी 22.00 ते दिनांक 02/02/2019 रोजी 02.30 वा.चे दरम्यान मुरलीधर श्रीधर मोहीते रा.नांदुरी ता.तुळजापूर यांनी त्यांचे घरासमोर लावलेली त्यांची जुनी वापरती काळया रंगाची एच.एफ.डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए.एफ. 1076 किं.अं. 30,000/- रु. ची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेली आहे. म्हणून मुरलीधर श्रीधर मोहीते यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयांविरुध्द दिनांक 04/02/2019 रोजी पोलीस स्टेशन तामलवाडी येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उस्मानाबाद येथे मोटारसायकल चोरी

पोलीस स्टेशन आनंदनगर :- दिनांक 03/02/2019 रोजी 21.30 ते दिनांक 04/02/2019 रोजी 06.30 वा.चे दरम्यान राहुल किसन थोडसरे रा.शिवसृष्टी नगर जुना उपळा रोड उस्मानाबाद यांनी त्यांचे घरासमोर लावलेली हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए.एन. 9037 जु.वा.किं.अं. 45,000/- ची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेली आहे. म्हणून राहुल किसन थोडसरे यांचे फिर्यादवरुन अज्ञात चोरटयांविरुध्द दिनांक 04/02/2019 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मौजे सास्तुर येथे चोरी

पोलीस स्टेशन लोहारा :- दिनांक 03/02/2019 रोजी 23.30 ते दिनांक 04/02/2019 रोजी 03.45 वा.चे दरम्यान मौजे सास्तुर येथे रमेश रामचंद्र भुरे रा.सास्तुर हे ईतर तीन रुमला बाहेरुन लॉक लावून ईतर दोन रुम मध्ये त्यांचे कुटूंबासह झोपले असताना तीन रुमच्या बाजुच्या पत्र्याचे शेडची आतील कडी अज्ञात हत्याराने काढुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने आत प्रवेश करुन आतील रुमचे बाहेरील लॉक कशानेतरी तोडून घरात प्रवेश करुन घरातील कपाटातील सोन्या चांदिचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 2,02,400/- रु.चा माल चोरुन नेला आहे. म्हणून रमेश रामचंद्र भुरे यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयांविरुध्द दिनांक 04/02/2019 रोजी पोलीस स्टेशन लोहारा येथे भादंविचे कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळंब येथे खरे सोने घेवून व बनावट सोने देवून फसवणूक

पोलीस स्टेशन कळंब :- दिनांक 04/02/2019 रोजी 09.30 वा.सु. सुमो चौक ढोकी नाका कळंब येथे रुक्मीण सिताराम पवार रा. जवळा ता.कळंब जि.उस्मानाबाद या बॅक ऑफ इंडीया या शाखेत निराधार पगार घेण्यासाठी पायी चालत जात असताना सुमो चौक येथे आल्या असता तेथे दोन अनोळखी ईसम यांनी त्याचेजवळ येवून म्हणाले की सोन्याचे बिस्कीट सापडले आहे हे तुमचे आहे का असे म्हणून बिस्कीट दाखविले हे मी तुम्हाला देतो त्याबदल्यात तुमच्याजवळचे सोने दया असे म्हणाले असता रुक्मीण पवार यांनी त्यांच्या गळयातील 7 ग्रॅमची सोन्याची बोरमाळ व 2.7 ग्रॅम सोन्याचे मन्याची माळ असा एकूण 30,000/- रु. चे दागिने दोन अज्ञात ईसमाना काढून दिले व ते दोन अज्ञात ईसम त्या बदल्यात सोन्यासारखे दिसणारे पिवळया रंगाचे चौकोनी बिस्कीट देवून फसवून निघुन गेले म्हणून रुक्मीण सिताराम पवार यांचे फिर्यादवरून अज्ञात दोन ईसमाविरुध्द दिनांक 04/02/2019 रोजी पोलीस स्टेशन कळंब येथे भादंविचे कलम 420,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3

मौजे कसबे तडवळा येथे अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

पोलीस स्टेशन ढोकी :- दिनांक 03/02/2019 रोजी 22.00 वा.सु. मौजे कसबे तडवळा येथे विजय बबन सोनटक्के रा.कसबे तडवळा ता.जि.उस्मानाबाद याने पिडीत मुलगा हा अल्पवयीन आहे हे माहित असताना सुध्दा त्याचे सोबत सतत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला म्हणून त्याचे विरुध्द दिनांक 05/02/2019 रोजी पोलीस स्टेशन ढोकी येथे भादंविचे कलम 377 सह बा.लैं.अ.सं.अधिनियमचे कलम 4,6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उस्मानाबाद येथे मागील भांडणाच्या कारणावरुन जबर मारहान

पोलीस स्टेशन उस्मानाबाद(शहर) :- दिनांक 04/02/2019 रोजी 19.30 ते 20.00 वा.चे सु. काकानगर सांजा रोड उस्मानाबाद येथे अरविंद उर्फ दादा रा.राजुरी हा विकास अनिल दंडानाईक रा.सांजा रोड शिवाजी नगर, उस्मानाबाद याचे जवळ आला त्यावेळी विकास दंडनाईक हा अरविंद उर्फ दादा यास म्हणाला की, तु मला परवाचे दिवशी कशामुळे मारले माझी काय चुकी होती असे विचारले असता अरविंद उर्फ दादा याने विकास दंडनाईक यांना शिवीगाळ करुन डोक्यात दगड मारला व चाकुने डाव्या गालावर, नाकावर वार करुन जखमी केले आहे वगैरे एम.एल.सी.जबाब वरून अरविंद उर्फ दादा याचे विरुध्द दिनांक 05/02/2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 326,323,504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमरगा येथे पिकअपची दोघांना धडक

पोलीस स्टेशन उमरगा :- दिनांक 04/02/2019 रोजी 17.30 वा.चे.सुमारास मसनजोगी वस्तीत गोविंद विभुते यांचे घराजवळ उमरगा येथे अजय रा. मसनजोगी वस्ती , भारतनगर उमरगा याने त्याचे ताब्यातील पिकअप क्र. एम.एच. 25 पी. 2909 ही हयगईने , निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून श्रीधर दिगंबर मुळे व त्यांची आई दोघे रा.मसनजोगी वस्ती भारतनगर , उमरगा या दोघांना धडक देवून श्रीधर दिगंबर मुळे यांचे पायाचे मांडीस व डावे हाताचे मनगटास मार लागणेस तसेच त्यांचे आईस कमरेस , उजवे पायाचे मांडीस , उजवे कोपरास , हातास व करंगळीस मार लागणेस कारणीभुत झाला आहे म्हणून श्रीधर दिगंबर मुळे यांचे फिर्यादवरून पिकअप क्र. एम.एच. 25 पी. 2909 चा चालक अजय याचे विरुध्द दिनांक 05/02/2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 279,337 सह मोवाकाचे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.

मौजे कांदलगाव येथे किरकोळ कारणावरून मारहान

पोलीस स्टेशन परंडा :- दिनांक 04/02/2019 रोजी 20.00 वा.चे सुमारास कांदलगाव येथे फिर्यादी महिला रा.कांदलगाव ता.परंडा व 1) गुरूदास ईश्वर कदम व एक महिला दोघे रा.कांदलगाव ता.परंडा यांचे लहान मुलाचे दुपारी झालेल्या भांडणाचे वेळी फिर्यादी महिलेस शिवीगाळ का केली असे विचारण्यासाठी फिर्यादी महिला , तिचा पती व सासरा असे वरिल आरोपीतांकडे गेले असता वरिल आरोपी 1) गुरूदास ईश्वर कदम व एक महिला यांनी संगणमत करुन डोळयात चटणी टाकुन हातातील लोखंडी कोयत्याने फिर्यादी महिलेस मारहान करुन जखमी केले व फिर्यादी महिलेचा पती सोडवण्यास आला असता त्याला पण नमुद आरोपींनी लोखंडी कोयत्याने उजव्या हाताचे बोटावर मारून जखमी केले तसेच लाथाबुक्याने मारहान केली व शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरून 1) गुरूदास ईश्वर कदम व एक महिला यांचे विरुध्द दिनांक 05/02/2019 रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे भादंविचे कलम 323,324,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4

उस्मानाबाद येथे बोअर मधील मोटार व वायरची चोरी

पोलीस स्टेशन आनंदनगर :- दिनांक 01/02/2019 रोजी 23.00 वा. हारिदास तुळशीराम शिंदे रा.जुना उपळा रोड , महात्मा गांधी नगर, उस्मानाबाद यांची सर्व्हे नं. 172 मध्ये तीन प्लॉट नं. 5,6,7 मध्ये असलेल्या बोअर मधील जलगंगा कंपनीची मोटार 2/25 एच.पी.ची. व चारशे पन्नास फुट वायर असे एकूण जु.वा.किं.अं. 14,500/- रु. चा माल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेला आहे. म्हणून हारिदास तुळशीराम शिंदे यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 05/02/2019 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मौजे हिवर्डा येथे चंदनाच्या लाकडाची चोरी व वाहतुक करणाऱ्यांवर गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन भुम :- दिनांक 04/02/2019 रोजी 18.00 वा. हिवर्डा शिवारात भाऊसाहेब मुंढे यांचे शेताजवळील तळयालगत मौजे हिवर्डा येथे 1) दत्ता भिमराव मुंडे रा.हिवर्डा ता.भुम 2) रामदास पवार रा.वांगी ता.भुम 3) रामा माळी रा.नारी ता.बार्शी जि.सोलापूर यांनी बेकायदेशिर रित्या आपले जवळील कार मध्ये चंदनाचे लाकूड , चुर्ण , मापे , गाडी व साहित्यासह एकूण किंमत 1,87,187/- रु चोरीची वाहतूक करित असताना मिळुन आले म्हणून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक05/02/2019 रोजी पोलीस स्टेशन भुम येथे भादंविचे कलम 379,411 सह भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41,42(1),42(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही दरोडा प्रतिबंधक पथक उस्मानाबाद यांनी केली आहे.