यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मारकाच्या प्रश्नावरती विधानसभेत आवाज उठवणार – आमदार बच्चू कडू

0
1086
Google search engine
Google search engine

महाराष्ट्राचे शिल्पकार व माजी मुख्यमंत्री स्व यशवंतराव चव्हाण साहेब यांचे जन्मगाव सांगली जिल्ह्यातील देवराष्टे ता.कडेगांव या ठिकाणी असलेल्या जन्मघर स्मारकाच्या विकासासाठी विधानसभेत आवाज उठवणार असल्याची माहिती आमदार बच्चु कडू यांनी शिव व्याख्याते ओंकार औंधे यांना दिली.शिव व्याख्याते ओंकार औंधे यांनी मुंबई येथील मंत्रालयात आमदार बच्चु कडू यांना या प्रश्नाबाबत निवेदन देवून या प्रश्नावरती आवाज उठवण्याची मागणी केली.यामध्ये औंधे म्हणाले की,स्व यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या स्मारकासाठी तत्कालीन सरकारने 2कोटी 17लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता तो निधी महसूल खाते यांच्याकडे पडून आहे.त्यामधील एकही रुपया या कामासाठी खर्च केला गेला नाही.तसेच ही वास्तू पुरातत्व खाते यांच्याकडे देखभालीसाठी असताना सुध्दा या खात्याच्या एकाही अधिकारी यांनी या वास्तूला 4 वर्षात एकदा ही भेट दिली नाही.ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी नवमहाराष्ट्र निर्माण करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले त्या स्व. चव्हाण साहेबांचा या सरकारला विसर पडला आहे.तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांनी ही वास्तू 5 वर्षाच्या करारावरती देखभालीसाठी सरकारकडून घेतली होती.ती करार मुदत ही आता संपुष्टात आली आहे.तरी सदर प्रश्नावरती सरकाला जागे करण्यासाठी आपण जनसामान्य शेतकरी वर्गाचे नेते आणि अभ्यासू आमदार म्हणून आवाज उठवावा अशी मागणी आमदार कडू यांना केली असल्याची माहिती औंधे यांनी दिली आहे