रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए) तर्फे पाचोरा येथे कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्सवात संपन्न…

0
875
Google search engine
Google search engine

पाचोरा :- दिनांक ५-२-२०१९ रोजी दुपारी १२ वा. रिपाइं(ए) च्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. काही दिवसावर होऊ घातलेल्या लोक सभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आज राजीव गांधी टाऊन हॉल येथे आयोजित कार्यकर्ता मेळावा येथे म.राज्य उपाध्यक्ष मा.रमेशजी मकासरे यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्याचे आयोजन तालुका अध्यक्ष विनोद अहिरे यांच्या वतीने करण्यात आले होते.
या वेळी प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन पक्षाचे खांदेश विभाग अध्यक्ष .लक्ष्मणजी जाधव ,जिल्हा प्रमुख .आनंद बाविस्कर, लोकसभा जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक .आनंद जी. खरात,जळगाव जिल्हा सरचिटणीस मिलिंद तायड़े ,युवा जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे,जिल्हा उपाध्यक्ष भगवान आढाळे, जिल्हा उपाध्यक्ष युवराज सोनवणे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ.नंदाताई बाविस्कर,महिला आघाडीच्या जेष्ठ नेत्या सत्यभामाताई अहिरे,महिला आघाडी जिल्हा कार्यध्यक्ष सौ.चारुलता सोनवणे,युवा जिल्हा उपाध्यक्ष बाळु निकम युवा जिल्हा कार्याध्यक्ष अशोक तायडे,रावेर युवा अध्यक्ष विजय धनगर, जळगाव महानगर महिला आघाडी प्रमुख सौ.प्रतिभाताई भालेराव, भडगांव तालुकाध्यक्ष अण्णा खेडकर,चाळीसगाव तालुका कार्यअध्यक्ष तन्वीरभाई शेख,अशोक मोरे, भालचंद्र ब्राम्हण, भैया भगवान,
समवेत कविता वानखेडे,यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.