बाळापूर पोलिसांनी अवघ्या 2 तासात लावला चोरीचा छडा

0
670
Google search engine
Google search engine

अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

अकोला/ प्रतिनीधी

बाळापूर पोलिसांनी अवघ्या 2 तासात चोरीचा छडा लावत वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.पोलीस सुत्रानुसार
बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील वाडेगाव शेत शिवारातील श्यामलाल मनसराम लोध ह्यांचे शेतातील गोडाऊन मध्ये ठेवलेल्या तुरीच्या 50 कट्ट्या पैकी 20 कट्टे किंमत 85, 000 रुपयांचे धान्य कोणीतरी अज्ञात चोरांनी रात्रीच्या वेळेस चोरल्याची फिर्याद पोलीस स्टेशनला आल्या नंतर बाळापूर पोलिसांनी तपास चक्र फिरवून अवघ्या 2 तासात चोरीचा शोध लावण्यात यश प्राप्त केले

, ह्या मध्ये वाडेगाव च्या जागरूक नागरिकांनी वेळीच बाळापूर पोलिसांना माहिती दिल्याने मुद्देमाला सह दोघे जणअर्जुन विष्णू म्हैसने व ज्ञानेश्वर रामदास चिंचोळकर दोन्ही राहणार वाडेगाव ह्यांना ताब्यात घेऊन त्यांचे कडून 1 पिकउप चार चाकी वाहन व 16 कट्टे तूर असा जवळपास अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात बाळापूर पोलिसांना यश प्राप्त झाले, बाळापूर परिसरात ह्या पूर्वी धान्य चोरीच्या घटना घडल्या असल्याने ह्याबाबत चौकशीअंती आणखी गुन्हे उघडकीस येण्याची श्यक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगितले.पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक डॉक्टर निलेश देशमुख ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन शेळके, हेड कॉन्स्टेबल सुभाष राठोड, विनायक पवार हे करीत आहेत.