मळणी यंत्रात आडकून महिला जागेवर ठार ; उस्मानाबाद जिल्ह्यातील घटना

0
1460
Google search engine
Google search engine

मळणी यंत्रात आडकून महिला जागेवर ठार

उस्मानाबाद – शालुबाई जग्गनाथ पवार वय ४२ वर्षे रा किणी ता उस्मानाबाद या महिलेचा मळणी यंत्रात अडकून जागेवरच म्रत्यु झाल्याची घटना घडली आहे. हि घटना ता ६ (बुधवारी) दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सदर घटनेची माहिती नरसिंग विलास हजगुडे यांनी ढोकी पोलिस ठाणे येथे दिली आहे हि घटना शेषेराव साहेबराव हजगूडे किणी यांच्या शेतात दोन वाजण्याच्या सुमारास घडली असून महिलेचे केस व कपडे मळणी यंत्रणात अडकून जागेवरच म्रत्यू झाल्याने घटनास्थळी ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणपत जाधव यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.