मुंडगावात संत बायजाबाई याञे मध्ये घेतला हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ

640

संत बायजाबाई याञेची सांगता:भागत सप्ताहात विविध काय॔क्रम उत्साहात

आकोट/ता. प्रतिनिधी

-शेगाविचे राणा संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या आकोट तालुक्यातील मुंडगाव पंचक्रोशीतील संत बायजाबाई यात्रेची दि.5 फेब्रुवारी रोजी सांगता करण्यात आली.यात्रेनिमित्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ .घेतला.
संत बायजाबाई यांच्या यात्रोत्सवानिमित्त मुंडगाव येथे 30 जानेवारी पासून भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहातग॔त दररोज विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. मंगळवार रोजी संध्याकाळी महाप्रसादाला सुरूवात झाली. तसेच यात्रेत विविध वस्तूंची दुकाने थाटविण्यात आली होती. संत बायजाबाई मंदिरात जावून भाविक नतमस्तक झाले. यात्रा उत्सवासाठी गावकरयांनी सहकार्य केले. यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात विविध दुकाने थाटविण्यात आली होती. गाव व परिसरातील भाविकांनी खरेदीचा आनंद लुटला.

जाहिरात