वारुळा येथिल गौमाता यात्रे निमित्त अखंड हरिनाम सप्ताह

0
613

आकोट / ता. प्रतिनिधी

तालुक्यातील वणी वारूळा येथील गौमाता यात्रा महोत्सवा निमित्ताने दि. ६ फेब्रुवारी पासुन ज्ञानेश्वरी पारायण, विठ्ठल नाम जप व अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होणार आहे. तर यात्रा महोत्सवाची सांगता दि. १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

सदर सप्ताहाचे नेतृत्व संजय म. शेलार हे करणार आहेत. तर कलश पुजन ह. भ. प. श्रीधर महाराज कराळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सप्ताहात दररोज सकाळी ५ते६काकडा, ९ते१२व ३ते५ ज्ञानेश्वरी पारायण, ५ते६ विठ्ठल नाम जप , ६ते७ हरिपाठ, ८.३०ते१०.३० पर्यन्त कीर्तन राहणार आहे. या सप्ताहात दि. ६ फेब्रुवारी ला गणेश शेटे याचे कीर्तन, दि. ७ फेब्रुवारी ला हभप अमृत म. गाढे याचे कीर्तन, दि. ८ फेब्रुवारी ला हभप पंकज म . पवार याचे कीर्तन, दि. ९ फेब्रुवारी ला हभप भानुदास म. पाटील यांचे कीर्तन, दि. १० फेब्रुवारी ला हभप विशाल म. खोले याचे कीर्तन, दि. ११ फेब्रुवारी ला हभप नारायण म. शिन्दे याचे कीर्तन, दि. १२ फेब्रुवारी ला हभप बळीराम म. दोड याचे कीर्तन, दि. १३ फेब्रुवारी रोजी हभप पंढरीनाथ म. आरु याचे सकाळी १० ते १२ काल्याचे कीर्तन होईल.

या सप्ताहात मार्गदर्शक हभप सोपान शेलार, हभप रामभाऊ पा. मोहोकार, हभप मनोहर पा. मोहोकार, तर गायनाचाय॔ हभप दामोदर कराळे, निवृत्ती शेलार, रवींद्र इंगळे, रामदास हिरपुरकर, देविदास काळे, ब्रह्मा पाटील, सह असंख्य गायनाचाय॔ राहतील. या सप्ताहात मृदुगांचाय॔ गजानन मोहोकार, मधुकर मोहोकार, लक्ष्मण यादगीरे, तर चोपदार बंडू मंजुळकार, मनोहर वसतकार, हे राहणार आहेत तरी या सप्ताहाचा व यात्रेचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवगाय संस्थान चे अध्यक्ष भुषण मोहोकार व गौमाता महिला मंडळ, गौमाता क्रिडा मंडळ व समस्त गावकरी मंडळी वणी वारूळाच्या वतीने करण्यात आले आहे..