टाकापाटी येथे भिषण अपघात ; दोन ठार तर आठ जखमी

0
883

टाकापाटी येथे भिषण अपघात ; दोन ठार तर आठ जखमी

औसा / प्रतिनिधी

ओसा तालुक्यातील रत्नागिरी नागपूर राज्य मार्गावरील टाका पाटी येथे दिलीप बुल्डकाँन कंपनीचे टँकर व टाटा सुमो यांच्या भीषण अपघात झाला. त्यामध्ये 2 जणांचा जागीच म्रुत्यु झाला असून 8 जखमी झाले आहेत. सविस्तर माहिती अशी कि.टाटा सुमो मधील सर्वजण हे लातुर जिल्ह्यातील शीरूळ अनंतपाळ तालुक्यातील असून ते तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जात होते.म्रुत्यु झालेल्या दोन्ही व्यक्ती ह्या मागील 25वर्षापासून मुंबई येथे राहत होते. ते एक दोन दिवसापुर्वी आपल्या गावी म्हणजे येरोळ येथे आले होते. त्यांनी गावी येवून काल देवीची कंदुरी करून ते आज तुळजापूर ला जात असताना टाटा सुमो MH 24 C 6457 व दिलीप बुल्डकाँन कंपनीच्या टँकर MP 39 G 1863 चा समोरासमोर भीषण अपघात झाला. त्यामध्ये विवेक राजे शिर्के व अरूण कोयंडे यांचा जागीच म्रुत्यु झाला असून 8 जण गंभीर जखमी त्यामध्ये नितीन वाघमारे वय 43, नितेश कट्टकधोन वय 30,मच्छिंद्र कल्याणकर43,संजय चव्हाण 45,मच्छिंद्र भालेराव 37,हरी नारायण यादव,प्रमोद तिवारी, कपील मुणी हे जखमी झाले आहेत. परिसरातील नागरिकांनी तात्काळ 108नं वर फोन करून अपघाताची माहिती दिली व जखमींना लातुर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.