कोंडमध्ये दारुच्या महापूरात शेकडो तरुण बुडाले

0
1089
Google search engine
Google search engine

कोंडमध्ये दारुच्या महापूरात शेकडो तरुण बुडाले

उस्मानाबाद / उस्मानाबाद तालुक्यातील कोंड या गावांमध्ये पुन्हा हातभट्टी दारूने उच्चांक गाठला आहे देशी विदेशीसह हातभट्टी दारु उसळली आहे . या गावामध्ये एकूण सात ठिकाणी दारूचे मोठे मोठे आड्डे आहेत कोंड हे गाव परिसरातील गावासाठी बाजारपेठ समजले जाते परंतु या गावांमध्ये सध्या तर दारुची बाजारपेठ झाल्याचे दिसत आहे उस्मानाबाद तालुक्यातील हे गाव असून या गावांमध्ये तीन शाळा एक दवाखाना आहे या ठिकाणी कर्मचारी शिक्षक व शिक्षिका विद्यार्थीनी यांना दररोज शाळेत ये जा करावे लागते दवाखान्यामधील कर्मचारी वर्गाला दारुडे आरेरावी करतात . रस्त्यावर या दारुड्याचा धिंगाणा बघावं लागत आहे गेल्या काही दिवसांमध्ये ढोकी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणपत जाधव यांनी कोंड गावांमध्ये एकाच वेळेत धाडी मारून तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली होती.परंतु सध्या गावामध्ये सर्व ठिकाणी दारूचे धंदे जोरात व तेजीत सुरू असून दारुड्यांची मोठ्या प्रमाणात सोय झाल्याचे दिसत आहे.व दारुविक्री करणार्यांकडून चिरिमिरी घेऊन त्यांना अभय दिले जाते कि काय असा सवाल उपस्थीत होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच गावात दारूबंदी समितीची स्थापना केली असून समितीच्या वतीने जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक दारूबंदी विभागाचे अधीक्षक यांना लेखी स्वरुपात निवेदन देण्यात आले आहे परंतु फक्त ढोकी पोलिसांकडून कार्यवाही करण्यात असून इतर कोणत्याही विभागाने कारवाई केली नसल्यामुळे नेमके या धंदेवाल्या चे आणि त्यांचे लागेबांधे आहेत की काय ? असा सवाल उपस्थित होत आहे राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत या अवैध दारू विक्री करणार्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी कोंडवाशीयाकडून केली जात आहे गावात पाणी कमी पण दारूच जास्त झालेली आहे. गल्लीबोळात मोठमोठे दारूचे व्यवसाय थाटले आहेत .दारु पिऊन अनेकांचे कुटूंबे उद्धवस्त झाले आहेत. कोंडच्या हातभट्टी दारुच्या महापूरात शेकडो तरूण बुडाले आहेत. गावात दारुड्यांचे प्रमाण वाढले आहे.या दारु विक्रेत्यांना नेमकं कोणाचं अभय आहे ?प्रशासन हे त्यांच्या ईमानदारीला किती जागत आहे ? यावरून स्पष्ट दिसत आहे या अवैध दारू विक्री करणार्‍यावर तात्काळ जर दारूबंदी विभागाने कारवाई नाही केली तर तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दारूबंदी समितीच्या वतीने देण्यात आला आहे