मराठा महासंघाच्या सचिवपदी सौ किरण निंबाळकर

311
जाहिरात

उस्मानाबाद – अखिल भारतीय मराठा महासंघाच्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या महिला सचिव पदी सौ.किरण निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे.उस्मानाबाद येथील मराठा समाजाच्या न्याय व हक्कासाठी सतत धडणार्या सौ किरण परशुराम निंबाळकर यांची नुकतीच महिला जिल्हा संघटनेच्या जिल्हा सचिव पदी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार नरेंद्र पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. ही निवड उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये 6 फेब्रुवारी रोजी करण्यात आली.मराठा महासंघाचे कार्य व विचार समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवून सूर्य क्रांती भगव्या झेंड्याखाली एकत्र येऊन समाजातील तळागळात पोहोचून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सौ किरण निंबाळकर यांना संधी मिळाली आहे.त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. या निवडीदरम्यान जिल्हाध्यक्षा सौ रेखाताई लोमटे व तालुका अध्यक्षा सौ अर्चना कोंडेकर यांच्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातील मराठा समाजाचे सर्व पदाधीकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।