शेतकऱ्यांच जगणं मान्य करा अन्यथा निसर्ग कोपेल : श्री  मकरंद अनासपुरे ◆ संत्रा नगरीत राष्ट्रीय कृषी विकास परिषदेचे थाटात उद्घाटन

0
1032
Google search engine
Google search engine

वरुड / मोर्शी :-

शेतकऱ्यांनी व्यावसायिक झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नसून शेतकऱ्यांना अडविणारे जाचक कायदे बंद केले पाहिजे. शेतकऱ्याचा विचार करणाऱ्या प्रत्येकाने बारकाईने विचार करून प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. भौगोलिक परिस्थीचा विचार करूनं शेती केल्यास फायदेशीर होईल.शेतकऱ्यांच्या हक्काच मिळाल पाहिजे,शेतकऱ्यांच जगन मान्य करा अन्यथा निसर्गही आक्रमित झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन प्रख्यात सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांनी केले.ते संत्रानगरी वरुड येथे आयोजित राष्ट्रीय कृषी विकास परिषदेत बोलत होते.
या प्रसंगी व्यासपीठावर राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाषा पटेल,आमदार डॉ अनिल बोंडे,सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे,भारत जाधव,डॉ वसुधा बोंडे, नगराध्यक्ष स्वाती आंडे, रुपेश मांडवे,योगेश्वर खासबागे,माजी नगराध्यक्ष रवींद्र थोरात,रामराव वानखडे,सुभाष गोरडे, दुर्वास पाटील,भाजपा महिला उपाध्यक्ष अंजली तुमराम,अर्चना मुरुमकर,चैताली ठाकरे,किशोर भगत, नितीन निस्वादे,दिलीप टाकरखेडे, मनोज गुल्हाने, जगदीश उपाध्याय, मोरेश्वर वानखडे,रमेश हुकुम, डॉ.नितीन वानखडे,प्रवीण कुंडलकर, सुरेंद्र आंडे, शशी उमेकर, वंदना तिडके, तालुका कृषी अधिकारी उज्वल आगरकर, राजू सुपले, इंद्रभूषण सोंडे, अनिल इंगळे, तहसीलदार आशिष बिजवल, प्रा.हेमंत सोनारे, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, प्रा.नरेशचंद्र काठोळे, भाऊसाहेब वसुले, बाबुराव कंठक, नीलकंठ मुरुमकर, सतीश अकर्ते, उपविभागीय कृषी अधिकारी सातपुते, एमआयडीसीचे ठोसर, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष ज्योती कुकडे, ज्योती फुटाणे, नितीन खेरडे, सुधीर धर्मे, विशाल सावरकर, शालिनी चोबितकर, माधुरी भगत, जेठानंद बाशानी आदि उपस्थित होते. ते पुढे म्हणाले कि, शेतकऱ्यांमध्ये पिक निहाय दुही माजवून त्यांना परावलंबी केल गेल परंतु एकत्र येणे हि काळाची गरज आहे, बहुवार्षिक पिक पद्धतीचा अवलंब करावा. गावोगावी शेतकऱ्यासाठी कृषी मार्गदर्शन केंद्र उभे व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी भारत गणेशपुरे यांनी विदर्भ हा शेतकरी आत्महत्येचा प्रदेश म्हणून ओळखला जातो हि खंत असून ती बदलली पाहिजे. सकारात्मक दृष्टीकोण ठेवल्याशिवाय शेती समृध्द होणार नाही. शेतकरी जगणे महत्वाचे असून लोकांच्या मागे लागू नका जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघा. शेतीवर नवनवीन प्रयोग करून आपले उत्पन्न वाढवा. बाजारपेठेचा विचार करून पिक पेरा वाढवा. गटशेतीची कास धारा असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतीतील भविष्यातील प्रश्नाकडे लक्ष द्यावे लागेल, नक्षत्राचा विचार करून येणारे पावसाचे दिवस संपले असून ढग फुटी व दुष्काळ हे दोनच नक्षत्र असल्याचे यांनी सांगितले. दुष्काळ सहन करणारे पिके शेतकऱ्यांनी घ्यावी उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा मिळाला तरच शेतकरी जगेल यासाठी आम्ही प्रयत्न केला व २०२२ पर्यंत उत्पन्न दुप्पटीचे धोरण तयार केले. राज्य कृषी मूल्य आयोगाला स्वायत्त दर्जा देण्याच काम आम्ही केल असून जगातल्या चांगल्या रोपांच्या आयातीच्या कायद्यात बदल होणार असून शेतकऱ्यांना उच्च प्रतीची रोपे मिळणार आहे. संवेदनशील सरकार राज्यात असून २०२२ चा निर्धार करा. शेतकऱ्यांचे दिवस बदलले असून पर्यावरणाचा विचार करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. याप्रसंगी डॉ.अनिल बोंडे यांनी राष्ट्रीय कृषी विकास परिषद घेण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. उत्पादन वाढीपेक्षा उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी शास्त्रीय दृष्ट्या विचार करा. २०१९ पर्यंत धरणातील पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्याचा विचार सुरु आहे. सौर उर्जा प्रकल्पातून विजेची समस्या सुटणार असून संत्रा प्रकल्पातून शेतकरी समृद्ध होणार आहे. या कृषी विकास परिषदेतून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान अवगत होणार असून याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे संचालन डॉ.अमोल कोहळे व उज्वला खोरगडे, प्रास्ताविक जिल्हा कृषी अधिकारी अनिल इंगळे तर आभार डॉ.वसुधा बोंडे यांनी मानले.
यावेळी अपंग चित्रकार युवराज ठाकरे यांनी भारत गणेशपुरे व मकरंद अनासपुरे यांना तैलचित्र भेट दिले. यावेळी नैना मांडवेकर, नारायण मेंढे, बापूराव मेंढे, नीळकंठ मुरुमकर, धनराज मानकर, शुभम गव्हाणे, गजानन बाळबुधे, बाळासाहेब सातपुते यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.