उमरग्यात सुपारी खाण्याच्या कारणावरून चाकूने वार

0
1489

उस्मानाबाद / पानपट्टी वर सुपारी (मावा )खाण्याच्या किरकोळ कारणावरून एकाने दोघांवर चाकूने वार केले. . यात दोघेही जखमी असून, एक जण गंभीर जखमी आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
ही घटना गुरुवारी रात्री दहा च्या सुमारास घटली.
याबाबत माहिती अशी कि, अण्णाराव राम पोळ वय 30 रा. महादेव गल्ली,उमरगा व आदित्य दिलीप शिराळे वय 20रा. सय्यद बशा गल्ली, उमरगा हे रात्री दहाच्या सुमारास, शिवाजी चौकातील पानपट्टी वर मावा खाण्यासाठी थांबले होते. यावेळी आरोपी महानंदेशवर महादेव बताले रा. नळदुर्ग तालुका तुळजापूर हा तेथे आला. मावा अगोदर कोणाला द्यायचा या किरकोळ कारणावरून त्यांच्यात भांडण झाले. यावेळी आरोपी ने खिशातील चाकू काढून आदित्य च्या पोटावर वार केले. यावेळी आदित्य ला वाचविताना अण्णाराव मध्ये पडला असता त्याच्यावर ही वार करण्यात आला. यात आदित्य शिरोळे गंभीर जखमी झाला तरी पोळ यांच्या मनगट ला जखम झाली असून दोघंही जखमी वर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या प्रकरणी आरोपी महानंदेशवर याला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.