*न.प. प्राथ. इंग्रजी शाळेच्या स्नेहसंमेलनाणे वेधले सर्वांचे लक्ष*

0
813
Google search engine
Google search engine

*न.प. प्राथ. इंग्रजी शाळेच्या स्नेहसंमेलनाणे वेधले सर्वांचे लक्ष*

चांदुर बाजार //प्रतिनिधी
स्थानिक चांदुर बाजार शहरातील वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद प्राथमिक इंग्रजी शाळा क्र.२येथील क्रीडा महोत्सव तसेच विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कला प्रदर्शनाने संपन्न झालेल्या वार्षिकोत्सवाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी न.प. च्या शिक्षण व आरोग्य सभापती वैशाली गुलक्षे यांच्या अध्यक्षतेखाली नगर सेवक गोपाल तिरमारे यांनी दीप प्रज्वलित करून बक्षीस वितरण व वार्षिकोत्सवाचे उदघाटन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून न. प. च्या महिला व बालकल्याण सभापती लविनाताई अकोलकर, नगरसेवक अतुल रघुवंशी, टिकू अहिर, मीनाताई काकडे, आबीद हुसेन, उषाताई माकोडे, वैशालिताई खोडपे, नंदलालजी शर्मा मुख्याधिकारी जितकुमार सेजव, न.प. प्रा.शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार टाक, निलेश गुप्ता, अनिस अहेमद, वसीम अहेमद, सर्व माजी मुख्याध्यापक इत्यादी मान्यवरांनी आपली उपस्तिथी प्रामुख्याने दर्शविली.
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज न.प.प्राथमिक इंग्रजी शाळा क्र.२ च्या दरवर्षी संपन्न होणाऱ्या वार्षिकोत्सवाच्या तुलनेत यावर्षी चिमूकल्यांच्या अभिनव सादरीकरणातून पार पडलेल्या बक्षीस वितरण व वार्षिकोत्सव समारोहाने उपस्थित पालक वर्गाचे व नागरिकाचे लक्ष वेधून घेतल्याने मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून विविध स्पर्धेत विजयी ठरलेल्यांना मोठया प्रमाणात बक्षिसे देऊन चीमुकल्यांचा उत्साह वाढविला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त खेळाचे साहित्य मुलांकरिता मान्यवरांच्या हस्ते शाळेला प्रदान करण्यात आले व लहान मुलांना बचतीची सवय आणि बँकिंगचे व्यवहार समजण्याकरिता राजमाता जिजाऊ चिलड्रेन्स बँकेचे तसेच संगणक प्रशिक्षण कक्षाचे सुद्धा उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता सहाय्यक शिक्षक श्री कुरई, काळे मॅडम, खांदे मॅडम, अश्विनी अविनशे, शीतल भेले, बोण्डसे मॅडम व इतर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.