विर्दभात जि.प. शाळेत “ई-टिच” पहिली ते चौथीचा समावेश व्हिडीओ व्दारे दिले जातात धडे.

0
827

 

विर्दभात जि.प. शाळेत “ई-टिच”

पहिली ते चौथीचा समावेश
व्हिडीओ व्दारे दिले जातात
धडे.

चांदुरबाजार – जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थांना इंग्रजी विषयाची आवड निर्माण व्हावी,जि.प.व न.प.शाळातील कमी झालेली संख्या वाढावी दृष्टीकोनातुन संपुर्ण विर्दभात अपेक्षा होमिओ सोसायटीच्या अंर्तगत ‘सतपुडा एकीकृत ग्रामिण विकास संस्था, बहिरम’ यांच्या वतीने ‘ई-टिच’ कार्यक्रम राबविल्या जात आहे.
राज्यातील जि.प.शाळांना गळती लागल्यामुळे व पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे गेला असल्यामुळे “द बाँंम्बे कम्युनिटी पब्लीक ट्रस्ट, अपेक्षा होमिओ सोसायटीव सिरडी संस्था बहिरमच्या वतीने इंग्रजी ‘ ई-टिच’ हा उपक्रम २०१८ते२०१९ मध्ये राबविल्या जात आहेत, विर्दभातील ३५ तालुक्यामध्ये हा उपक्रम सुरू आहे. या कार्यक्रमामुळे ईंग्रजी विषयाचे अध्यापनव अध्ययन सुलभ झाले आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चाईल्ड राईट एलायंन्स, सिरडी संस्था बहिरम संस्थेच्या पदाधिकारी डाँ. उपमा दिवान यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक सुषमा बैस या काम बघत आहे.
हा उपक्रम संपुर्ण विर्दभातील ११ जिल्हे,३५ तालुके ८५० शाळांमध्ये राबविल्या जात आहे. पुढील सत्रामध्ये आणखी तालुके वाढविण्यात येऊन त्यात ‘ अचलपुर’तालुक्याचा समावेश आहे व इयत्या ५ वर्गाचा अभ्यासक्रम आलेला आहे.