क्रषी विभामार्फत कोंडमध्ये प्रधानमंत्री किसान योजनेचे घोषणापत्र घेण्याचे काम प्रगतीपथावर

0
668
Google search engine
Google search engine

क्रषी विभामार्फत कोंडमध्ये प्रधानमंत्री किसान योजनेचे घोषणापत्र घेण्याचे काम प्रगतीपथावर

उस्मानाबाद / प्रतिनिधी – उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथे क्रषी विभागामार्फत प्रधानमंत्री किसान योजनेचे सध्या शेतकऱ्याकडून स्वयंघोषणापत्र घेण्याचे काम प्रगतीपथावर आहे. उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथील कृषी सहाय्यक सौ संगीता लाड यांनी प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजने करता खातेदाराकडून प्रयोग घोषणापत्र घेण्याचे काम सुरु केले आहे सध्या हे काम प्रगतीपथावर सुरु असल्याचे दिसत आहे. कोंड येथील अल्पभूधारक १४०० शेतकरी असून सध्या कोंड येथील शेतकऱ्यांनी 800 स्वयंघोषणापत्र दिले आहेत. पुढील साहेब घोषणापत्र घेण्याचे काम सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांनी तात्काळ स्वयंघोषणापत्र द्यावे असे आवाहन कोंड येथील कृषी सहाय्यक सौ संगीता लाड यांनी केले आहे यावेळी कोंड येथील ग्रामरोजगार सेवक बालाजी लोंढे शेतकरी तुकाराम लोंढे कृषी सहाय्यक सौ .संगीता लाड ,सुनील पाटील ,आत्मलिंग शेटे, नामदेव वाघमारे ,महादेव भूमकर, सुलेमान मुलानी, गोरोबा सुतार, सोमनाथ मुळे, आदी शेतकरी उपस्थित होते.