चालत्या गॅस टँकरच्या ट्रकला लागली लाग – सुदैवाने जिवीतहानी टळली

0
661
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील एक्सप्रेस हायवेवरील घटना 
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
 एचपीचा गॅस टँकर घेऊन जाणाऱ्या ट्रकने अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील एक्सप्रेस हायवेवर अचानक शनिवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने यामध्ये जिवीतहाणी झाली नाही.
    प्राप्तमाहितीनुसार, एमएच ३४ वाय ३३०८ या क्रमांकाचा नागपुर वरून मुंबई कडे बाटीया कंपनीचा एचपी गॅसचा टँकर घेऊन जाणारा ट्रकाने चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेडजवळी हायवेवर अचानक पेट घेतला. यामध्ये ट्रकचे समोरील कॅबीन पुर्णत: जळाले आहे. ट्रकमधील चालक रामविलास यादव रा. गोरखपूर हा सुखरूप असुन केवळ ट्रकचे नुकसान झाले आहे. सदर आग शॉर्टसर्कीटने लागल्याचे समजते. घुईखेड येथील गावकऱ्यांनी पाण्याच्या ३ टँकरच्या मदतीने जवळपास १ तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. आग विझविण्यासाठी घुईखेड गावातील सरपंच विनय गोटफोडे, शेख रफीक, शेख समीर, श्रीकांत खोब्रागडे, लहाणु मेश्राम, शरद लडके, नारायण पाखरे, गुड्डु सिंगारे, बंडू नाचणे, बालू मिर्चापुरे, राहुल बागडे आदींनी परिश्रम घेतले. घटनास्थळावर पोलीस प्रशासन सुध्दा तत्काळ पोहचले होते. गॅसचा टँकर रिकामा असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
उशिरा पोहचले अग्निशमन दल
सदर आग लागल्यानंतर धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे येथील अग्निशमन दल घटनास्थळी उशिरा पोहचले. त्यापुर्वीच गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे दोन्ही अग्निशमन दलाच्या गाड्यांना तेव्हाच परतावे लागले. 
><><><><><><><><><><><><><
वाहनांच्या लांबच लांब रांगा 
एक्सप्रेस हायवे असल्याने वाहनांची वर्दळ एकसारखी सुरूच असते. सदर अपघात झाल्याने दोन्ही बाजुने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे जवळपास १ तासापर्यंत वाहतुक विस्कळीत झाली होती.