अशोक इंगळे यांचे काम प्रेरणादायी >< सभापती जयंत देशमुख : निरोप समारंभ

0
684
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे :- जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांच्यासाठी गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे यांचे काम प्रेरणादायी ठरले असून त्यांच्या या वयातील कामाच्या स्पुर्तीला तोड नाही, शिक्षण विभागात तालुक्याला गेल्या ३ वर्षापासून नंबर वन ठेवणारा अधिकारी असे उद्गार काढत जि.प .चे शिक्षण सभापती जयंतराव देशमुख यांनी निरोप समारंभाचे सत्कारमूर्ती अशोक इंगळे यांचा गौरव केला.
तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे हे ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले. त्या निमित्त आयोजित निरोप समारंभात सभापती देशमुख बोलत होते. सेवानिवृत्त होतांना हि सन्मान प्रेरणेचा व सन्मान गुणवत्तेचा हा चांगला उपक्रम इंगळे यांनी जिल्ह्याला दिला असे हि ते यावेळी म्हणाले. सन्मान प्रेरणेचा सन्मान गुणवत्तेचा व निरोप समारंभ असा दुहेरी कार्यक्रम कृष्णाजी पर्यटन स्थळ मालखेड रेल्वे येथे पार पडला यावेळी शिक्षण समितीचे राजेंद्र बहुरूपी,  जि.प . सदस्या राधिकाताई घुईखेडकर, अल्काताई देशमुख , पं. स.  सदस्य श्री देशमुख  यांच्यासह डायट चे प्राचार्य रवींद्र आंबेकर, अधिव्याख्यात हर्षलता बुराडे, पावन मानकर, उपशिक्षणाधिकारी वा. ग.  बोलके, ए. झेड. खान, प्रिया देशमुख, सदाशिव दाभाडे आदी उपस्थित होते.
यावेळी निरोपाला उत्तर देतांना इंगळे यांनी त्यांच्या सेवेतील अनेक चांगल्या वाईट प्रसंगातील आठवनिंना उजाळा दिला तालुक्यात काम करतांना त्यात केंद्र प्रमुख, नसतांना केवळ साधन व्यक्ती यांच्या भरवशावर काम करतांना खूप अडचणी आल्या परंतु इच्छा शक्ती व सकारात्मक दृष्टिकोन यांच्या भरोवशावरच आपण इथपर्यंत पोहचलो असल्याचे मत अशोक इंगळे यांनी व्यक्त केले. यावेळी अनेक शिक्षक संघटनांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला तर गटसाधन केंद्रा तर्फे त्यांचा मानचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. केंद्र प्रमुख यांच्या तर्फे हि त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी व अधिकारी वर्ग उपस्थित होते.  लिटिल स्टार चे मुख्याध्यापक विश्वास दामले यांनी गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे यांच्यावर कविता सादर करीत त्यांना काव्यमय पद्धतीने निरोप दिला. यावेळी तालुक्यातील शिक्षण विभागाचे सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, साधन व्यक्ती, मुख्याध्यापक, व शिक्षक वर्ग उपस्तीत होते.