अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणार – आमदार डॉ.अनिल बोंडे >< कृषी विकास परिषदेची यशस्वी सांगता

0
686
Google search engine
Google search engine

जरुडचा कृणाल ठरला भाग्यवान विजेता

*प्रतिनिधी*:-

अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद अल्पसंख्यांक मनोमिलन सोहळ्याला मिळाला हेच राष्ट्रीय कृषी विकास परीषदेच यश असून वेगळे सांगन्याची गरज नाहीं. अल्पसंख्याक समाजाची दशा आणि दिशा बदलणार काम आम्ही करतो. परिवर्तन होत आहे मात्र त्याची गती वाढविण्याची गरज आहे, शासन त्यासाठी प्रयत्नरत आहे. 3 वर्ष कर भरणाऱ्या अनियमित नागरिकांच्या घरांना नियमित करण्याचा काम आम्ही केलं, अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी सर्वकष प्रयत्न करू, असे प्रतिपादन आमदार डॉ अनिल बोन्डे यांनी केले. ते राष्ट्रीय कृषी विकास परिषदेत आयोजीत अल्पसंख्यांक मनोमिलन सोहळ्यात बोलत होते
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प्रसिध्द सत्रा व्यापारी ताजखान, भाजप अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश अध्यक्ष जमाल सिद्दीकी, आमदार डॉ अनिल बोन्डे, डॉ.वसुधा बोंडे, वरुड च्या नगराध्यक्ष स्वाती आन्डे, भाजप अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रमजान अन्सारी, मौलाना अब्दुल कलाम अल्पसंख्याक महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक फरजाना परवीन, भाजप अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असलम घाणीवाले, जिल्हा महामंत्री विनोद झानगडा, अशपाकभाई, शेघाटचे नगरसेवक आणिसभाई, शे.घाटचे नगराध्यक्ष रुपेश मांडवे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष अंजली तुमडाम, आत्मा तालुकाध्यक्ष शालिनी चोबितकर, माजी जि.प.सभापती अर्चना मुरुमकर, पं.स.सदस्य चैताली ठाकरे, वंदना तिडके, शे.घाटच्या माजी नगराध्यक्ष सरिता खेरडे, भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत, शहराध्यक्ष राजू सुपले, इंद्रभूषण सोंडे, भाजपा शहराध्यक्षा माधुरी भगत, बांधकाम समिती सभापती अर्चना आजनकर, आरोग्य समिती सभापती छाया दुर्गे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुवर्णा तुमराम, नगरपरिषद गटनेता नरेंद्र बेलसरे, नलिनी रक्षे, नगरसेविका शुभांगी खासबागे, मंदा आगरकर, छाया दुर्गे, सुवर्णा तुमराम, शेंदुरजनाघाटचे न.प.पाणीपुरवठा सभापती मोनिका भोंगाडे, बांधकाम सभापती सुनिता वंजारी, महिला व बालकल्याण समिती सभापती रेखा अढावु, अश्पाक शहा, अजहर शेख, शेख हारीफ, कमर अली, आसिफ भाई पहेलवान, नगरसेवक अनिस पठाण, नईम कुरेशी, मुश्ताक पठाण, आकीब अहेमद आदी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार डॉ अनिल बोन्डे पुढे म्हणाले की, राष्ट्रीय कृषी विकास परिषदेच्या माध्यमातून शेतकर्यांना शेती संबंधी विविध माहिती व मार्गदर्शन करण्यात आले, याचा फायदा शेतकऱ्यांना होवून त्याचे जीवन उंचावण्यास मदत होईल. गेली ४ दिवस या माध्यमातून महिला सक्षमीकरण, अल्पसंख्याकाच्या उन्नतीसाठी माहिती देवून सामाजिक भान जोपासले महिला बचत गटाच्या माध्यमातून उत्पन्न वाढीस हातभार लावून व इतराना प्रेरना देण्याचे काम या ठिकाणाहून आम्ही केले. भविष्यातही शेतकरी सुखी समृध्द व्हावा व महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते पुढे म्हणाले.
यावेळी बोलतांना भाजप अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश अध्यक्ष जमाल सिद्दीकी म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजाच्या उत्थानासाठी आमच्या शासनाने प्रयत्न केला. केवळ मतदानापुरता अल्पसंख्यांक समाजाचा आतापर्यन्त वापर केला गेला. कौशल्यविकास कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण देण्याची सोय आमच्या शासनाने केली याचा फायदा अल्पसंख्यांक तरुणांनी घ्यावा. शासनाच्या 350 योजना अल्पसंख्यांकासाठी आहें. स्वच्छ भारत अभियानाचा मोठा फायदा अल्पसंख्याक समाजाला झाला. भारतीय जनता पार्टी विकासाचं राजकारण करते.परकीयांच्या तावडीत असणाऱ्या भारतमातेच्या शिलेदातांना परत मातृभूमीत आणण्याचा काम आमच्या शासनाने केलं. अल्पसंख्याकासाठी काम करणार सरकार आहे आपण पाठीशी उभा राहावं असे प्रतिपदन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक आसिफ भाई संचालन व आभार नईम काझी यांनी केला.
सदर कृषी विकास परिषदेची सांगता या परिषदेमध्ये सहभागी झालेल्या शेतकरी, नागरिक यांचे साठी आयोजित केलेल्या लकी ड्रा स्पर्धेच्या सोडतीने झाला. यामध्ये जरुड येथील कृणाल खंडारे हा मोटारसायकल विजेता ठरला तर दिलीप सावरकर शे.घाट व मनोरमा मंगळे हे सायकल विजेते ठरले तर शे.घाट येथील अबरार हुसैन हा मसाजर विजेता ठरला. हि सोडत मंजिरी खोडे, रश्मी तलखंडकर, संपदा पडोळे, अन्वेशा उमेकर या चीमुल्यांच्या हस्ते काढण्यात आली.