कबड्डी स्पर्धेतून गावचा विकास, हाच तरुणांचा ध्यास

0
607
Google search engine
Google search engine

कबड्डी स्पर्धेतून गावचा विकास, हाच तरुणांचा ध्यास

चंदगड – कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील सुंडी गावामध्ये खास करून गावाचा विकास करता यावा आणि स्पर्धेच्या माध्यमातून तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील इतर सत्ताधार्यांचे लक्ष, विकासाच्या उद्देशाने आपल्या गावाकडे वळावं, म्हणून येत्या 18 फेब्रुवारी रोजी खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सुंडी गावामध्ये खेळाचे मैदान तयार करता यावे, तसेच सुंडी गावा शेजारी असलेला धबधब्याचे (सवती वजराचे) सुशोभीकरण तसेच डागडुजी करण्यासाठी लागाणारा खर्च उभा करावा, या उद्देशाने तरुणांच्या संकल्पनेतून या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे मुख्य आकर्षण प्रो कबड्डी लीगच्या सीजन सहामध्ये दमदार चढाई पट्टू ठरलेला आणि यू मुंबाच्या सर्व सामन्यांच्या विजयाचा शिल्पकार असलेला सिद्धार्थ देसाई असणार आहे.

सुंडी कबड्डी लीगचे प्रथम बक्षीस रक्कम चंदगड विधानसभा मतदार संघाचे, भाजपाचे नेते मा. श्री. रमेशराव रेडेकर व मा. श्री. आदित्य रेडेकर यांच्याकडून रुपये 22,222 इतकी असणार आहे. तर इतर विजेत्या संघांना तसेच वयक्तिकरित्या आकर्षित बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत. तरी सर्व संघांनी स्पर्धेला उपस्थित राहण्याचे आवाहन सुंडी तरुण मंडळांकडून केलं जातं आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
संजय पाटील – 77749 79270