वाईट प्रथा बंद करण्याचं काम भगवंतांनी केलं – कल्पनाताई ठाकुर >< घुईखेड येथे समाधी महोत्सव

0
975
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )

    संत श्रेष्ठ बेंडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामधील भागवतामध्ये सोमवारी भगवंताचा भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानंतर गोकूळामधील आनंद हा भागवताचार्य ह.भ.प. कल्पनाताई ठाकूर यांनी प्रतिपादन केला. गोकुळामध्ये ज्याप्रमाणे आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे घुईखेडला बेंडोजी बाबांच्या संस्थांमध्येसुद्धा सदर आनंदोत्सव साजरा केला. भगवंतांनी जन्मानंतर ज्या – ज्या लीला केल्या, त्या सर्व लीलांचे वर्णन सोमवारी भागवतामध्ये करण्यात आले. जगातील समाजामध्ये ज्या वाईट प्रथा होत्या, त्या वाईट प्रथा बंद करण्याचं काम भगवंतांनी केलेलं आहे. ते म्हणजेच गोवर्धन लीलेच्या माध्यमातून समाज सुधारणा केली असे प्रतिपादन भागवताचार्य ह.भ.प. कल्पनाताई ठाकुर यांनी केले. त्याचप्रमाणे सोमवारच्या कथेमध्ये भगवंताच्या विवाह सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आला. या भागवतादरम्यान सोमवारी आप्पासाहेब काकडे, विजय देशमुख व भिमराव वानखडे यांनी अन्नदान केले.