तहसीलदार, तलाठी, कृषी सेवक सुटीच्या दिवशी ही “ऑन ड्युटी” दुष्काळ आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे वाटप करीत रविवारी ही कार्यलाय सुरू

0
859
Google search engine
Google search engine

तहसीलदार, तलाठी, कृषी सेवक सुटीच्या दिवशी ही “ऑन ड्युटी”
दुष्काळ आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे वाटप करीत रविवारी ही कार्यलाय सुरू.

चांदुर बाजार//प्रतिनिधी

चांदुर बाजार तालुक्यातील 6 मंडळ पैकी 4 महसूल मंडळ हे दुष्काळ ग्रस्त असल्याने या तालुक्यातील दुष्काळ निधी वाटपाच्या माहिती संकलित करण्यासाठी तसेच शेतकरी याची अद्यावत माहिती जमावण्यासाठी चांदुर बाजार तालुक्यातील तहसीलदार ड्रा. आर डी चव्हाण आणि सर्व मंडळ अधिकारी,तलाठी,कृषी सेवक हे रविवारी सुद्धा ऑन ड्युटी असल्याचे चित्र चांदुर बाजार तालुक्यातील सर्व महसूल मंडळ आणि तहसील कार्यलाय मध्ये आहे.

केंद्र सरकार ने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी मध्ये समाविष्ट होणाऱ्या शेतकरी याची माहिती गोळा करण्याचे काम सुद्धा जलद गतीने सुरू आहे.त्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी चे वाटप लवकरात लवकर होणार असल्याचे स्पस्ट होते आहे.त्यामुळे चांदुर बाजार तालुक्यातील सर्व साझा कार्यलाय आणि तहसील कार्यलाय आज रविवार असून देखील सुरूच होते.

तर शेतकरी वर्ग याना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी चा थेट लाभ मिळत असल्याने शेतकरी याचे आधार कार्ड,बँक ची माहिती,सातबारा आणि चालू मोबाईल क्रमांक हा तलाठी कडून गोळा केला जात आहे.या योजनेचा लाभ थेट शेतकरी याना त्याच्या बँक खात्यात होणार आहे.त्यामुळे दुष्काळ निधी आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मुळे सर्व महसूल विभाग रविवार असून देखील ऑन ड्युटी आहे.

प्रतिक्रिया
*सुरुवातीच्या फेज मध्ये जे संपूर्ण तालुके दुष्काळ ग्रस्त घोषित आहेत. त्यानाच मदत देण्यात येत आहे. पुढच्या फेज मध्ये आपल्या तालुक्याला मिळतील.प्रधान मंत्री किसान सन्मान निधी लवकरात लवकर मिळावा या याकरिता शनिवार आणि रविवार सुटीच्या दिवशीही कामकाज सुरू आहे.तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचारी फिल्ड वर आहे.*
ड्रा. राजेश चव्हाण तहसीलदार चांदुर बाजार