मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तासगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल

0
1281
Google search engine
Google search engine

सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुक्रवार, दिनांक 15 फेब्रुवारी 2019 रोजीच्या सांगली जिल्ह्यातील तासगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारान्वये दिनांक 15 फेब्रुवारी 2019 रोजी 12.30 वाजल्यापासून ते 16.30 वाजेपर्यंत खालील मार्गावर पोलीस वाहने, ऍ़म्बुलन्स, फायर ब्रिगेड या वाहनांखेरीज सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत आदेश जारी केले आहेत.या आदेशानुसार विटा व आटपाडीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी – कॉलेज कॉर्नर तासगाव – भिलवडी नाका – विटा बायपास – विटा. कॉलेज कॉर्नर तासगाव – भिलवडी नाका – विटा बायपास – विटा नाका – आटपाडी. विट्याकडून येणारी वाहतूक सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी – विटा – विटा बायपास – भिलवडी नाका – कॉलेज कॉर्नर तासगाव – सांगली. आटपाडीकडून येणारी व सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी – आटपाडी – विटा नाका तासगाव – विटा बायपास – भिलवडी नाका – कॉलेज कॉर्नर तासगाव – सांगली.तसेच आपत्कालीन वेळी वरीलप्रमाणे वाहतूक वळवून देखील वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्यास तसेच या मार्गावरील ऊसाची वाहतूक करणारी वाहने व जड वाहतूक पुढीलप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात वळविण्याचे नियोजन केले आहे. विटाकडून तासगावकडे येणाऱ्या वाहनांसाठी – विटा – ढवळी फाटा – तुर्ची – निमणी – पाचवा मैल – सांगली. विटा – ढवळी फाटा – तुर्ची – निमणी – तासगाव बायपास – कॉलेज कॉर्नर तासगाव – सांगली. भिवघाटकडून तासगावकडे येणाऱ्या वाहनांसाठी – विटा नाका – चिंचणी – मतकुणकी फाटा – कॉलेज कॉर्नर – सांगली. सांगलीकडून विटाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी – सांगली – कॉलेज कॉर्नर तासगाव – बायपास तासगाव – निमणी – तुर्ची – ढवळी फाटा – विटा. सांगली – पाचवा मैल – निमणी – तुर्ची – ढवळी फाटा – विटा. सांगलीकडून भिवघाटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी – सांगली – कॉलेज कॉर्नर तासगाव – मतकुणकी फाटा – चिंचणी – विटा नाका तासगाव – भिवघाट.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.