वरुड येथील कृषी परिषदेचा सदर व्हिडीओ दंडार या “लोककलेचा” नृत्यांगणा हा स्त्रि पात्रातिल पुरुष

0
2121

वरुड मध्ये संपन्न झालेल्या कृषी मेळाव्यामध्ये शेतक-यांसाठी ग्रामिण लोकेकला कार्यक्रम दंडार चे आयोजन करण्यात आले होते. दंडार मध्ये पुरुषच स्त्रि पात्र करुन नृत्य अविष्कार सादर करतात. दोन प्रतिस्पर्धी एकमेकांना कोडे टाकुन नृत्याच्या माध्यमातुन मनोरंजन करतात. लावणी,गवळण या लोकनृत्याचे प्रकारही या दंडार मध्ये असता सोशल मिडीयावर वायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये नृत्यांगणा स्त्रि नसुन पुरुषच आहे. तो शेतक-यांचा मुलगा आहे. कृषी परीषदेमध्ये दंडार चे आयोजन करुन शेतक-यांचे मनोरंजन व दंडार या ग्रामिण लोककलेला प्रोत्साहन याचा मेळ साधलेला आहे. म्हणुन या सोशल मिडीयावर वायरल व्हिडीओ चे स्वागत करावे.