रस्ता सुरक्षा सप्ताहा अंतर्गत वाहनचालकांसाठी विशेष आयोजन

0
726

रोटरी क्लब,जेसीआय व शेतकरी मोटर्सचे विद्यमाने नेत्र तपासणी

आकोट/ता.प्रतिनीधी

रस्ता सुरक्षा सप्ताहा अंतर्गत वाहन चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन रोटरी क्लब ऑफ, अकोट ,जेसीआय अकोट व शेतकरी मोटर्स यांचे संयुक्त विद्यमाने स्थानिक पोपटखेड रोड स्थित रोटरी नेत्र रुग्णालय येथे करण्यात आले होते. .यावेळी मंचावर रोटरीचे माजी डिस्ट्रीक गव्हर्नर राजे संग्रामसिंग भोसले(नागपुर),हिरो मोटोकॉर्पचे एरीया सर्व्हिस मॅनेजर नीलेश बोराडे ,रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट्चे अध्यक्ष प्रभाकर मानकर,रोटरीचे अध्यक्ष अवि गणोरकर ,जेसीआय अध्यक्ष निलेश हाडोळे , पीएसआय मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते

.काही दिवसा अगोदरच रोटरी नेत्र रुग्णालयात नेत्र तपासणी करता लागणारी अत्याधुनिक राफ्रॕक्टोमिटर व A-स्कॅन मशिनचे लोकार्पण डिस्ट्रीक्ट गव्हर्नर राजूजी शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले होते. याच अत्याधुनीक मशिन दवारे अकोट शहरातील ऑटोचालक,कारचालक,एसटी ड्रायव्हर अशा विविध वाहनचालकांची नेत्र तपासणी करण्यात आली. 319 च्या वर लोंकांनी याचा लाभ घेतला.

शिबिराला विविध मान्यवरांनी भेटी दिल्या..राजे संग्रामसिंहजी भोसले यांनी मंचावरून रोटरी क्लब ऑफ अकोटच्या कार्याची प्रशंसा केली व भविष्यात रुग्णालयाच्या विकासाकरिता मदतीची ग्वाही दिली. रस्ता सुरक्षा सप्ताह हा जेसीआय युवा पिढीला घेऊन राबवीत असल्याचा आनंद व्यक्त केला व भविष्यात अशा प्रकल्पासोबत युवा पिडींना घ्यावे अशा भावना व्यक्त केल्या.माननीय निलेश बोराडे यांनी शिबिराला शुभेच्छा देत हीरो मोटोकॉप च्या सी.एस.आर प्रोजेक्ट अंतर्गत रोटरी रुग्णालयाच्या विकासाकरिता हिरो कंपनी भविष्यात सहकार्य करेल.देशभरात सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहअंतर्गत अनेक प्रकल्प हिरो कंपनी मार्फत घेतल्या जातात त्यामध्ये अनेक सामाजिक संस्था सहभागी होऊन देश अपघात मुक्त होण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जातात. त्यामुळे अकोट शहरात गेल्या साहा वर्षा पासुन निरंतर राबवत असलेल्या सप्ताहा बददल गौरव उदगार काढले.

शिबिराच्या यशस्वीते करीता वाहतूक विभागाचे अनिल लापुरकर, जगदिपसिंह ठाकूर,गणेश फोकमारे, रोटरीचे माजी अध्यक्ष रविंद्र् मुंडगावकर, ॲड. राजकुमार गांधी, श्याम शर्मा,संजय बोरोडे, अनंतराव काळे,जेसीआयचे विनोद कडू, संजय शेळके, अमर राठी, डॉ. अरविंद मोडक,अतुल भिरडे ,डॉ. सतीश महाले,अनुप गाव्हाने,देशपांडे, शेतकरी मोटर्सचे कल्पेश गुलाहे, श्रीकृष्ण नाथे, अजिंक्य तेलगोटे, मंगेश चंदन,अमर गावत्रे, पियुष लहान, कौशिक शेगोकार, शुभम शेगोकार,प्रदीप पिंजरकर यांनी शिबिराच्या यशस्वितेकरिता प्रयत्न केले कार्यक्रमाचे संचालन प्रकल्प प्रमुख नितीन शेगोकार, प्रस्ताविक नंदकिशोर शेगोकार व आभार प्रदर्शन रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव रोटेरियन राजकुमार गांधीयांनी केले अशी माहिती जेसीआयचे जनसंपर्क अधिकारी निलेश इंगळे कळवितात.