न्यू हायस्कूल लासुर स्टेशन येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण वातावरणात निरोप

0
1548

आकाश हिरवाळे/ औरंगाबाद :-

न्यू हायस्कूल लासुर स्टेशन येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. या निरोप समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध उद्योजक माननीय श्री प्रदीपभाऊ चव्हाण होते प्रमुख पाहुणे म्हणून पो.नि.कोळी साहेब व उपसरपंच गणेश व्यवहरे हे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मुंडे हे होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शिवव्याख्याते प्रदीपदादा सोळंके हे होते छत्रपती शाहू महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष नितीन थोरात तर स्था शा समितीचे अध्यक्ष सोपानराव चव्हाण यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.छत्रपती शाहू महाविद्यालयाचे डॉ.रणजीत गायकवाड व डॉ. गणेश जाधव यांनी शिवजयंती निमित्त व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रमाची सुरुवात कै.विनायकराव पाटील,यांच्या हस्ते छत्रपती शिवराय व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.

विद्यार्थ्यांनी मान्यवरांसाठी सुमधुर असे स्वागत गीत सादर केले. मान्यवरांच्या स्वागतानंतर न्यू हायस्कूल लासुर स्टेशन चे मुख्याध्यापक व डॉ. बाबासाहेब अम्बेडकर मराठवाड़ा विद्यापीठ सिनेट मेंबर सुनील निकम यांचा सह गावकऱ्यांनी व ज्येष्ठ नागरिक संघ व मार्केट कमिटीचे माजी सचिव काकडे व पतंजली योग समिती अध्यक्ष पानकर सर व मार्गदर्शक डॉ. विकास संगेकर यांनी विशेष सत्कार केले. नितीनभाऊ थोरात यांच्या कल्पनेतून पुष्पगुच्छ देण्याऐवजी मान्यवरांना स्वागतासाठी पुस्तके देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी छत्रपती शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य नाईकवाडे सर,व सर्व सदस्य व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
शिवचरित्रकार प्रदिपदादा सोळंके यांनी उपस्थितांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले
व सर्वांची मने मंत्रमुग्ध करून टाकली.
कार्यक्रमाची सांगता अध्यक्षीय भाषणाने झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेचे शिक्षक दवणे श्रीकृष्ण यांनी केले तर आभार प्रदर्शन वेताळ अरुण यांनी केले.
कार्यक्रमानंतर सर्व विध्यार्थ्याना शाळेकडून अल्पोपहार देण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या व महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.