बजरंग दल आणि चांदुर बाजार पोलीसाची संयुक्त कार्यवाही – 27 गौवंश आणि 6 पिकअप पकडले

0
1500
Google search engine
Google search engine

 

 

*चांदुर बाजार//प्रतिनिधी*

मागील काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात अवैध गौवंश च्या अनेक घटना घडत आल्या आहे यातच नुकतीच अमरावती जिल्हा ग्रामीण अधीक्षक यांच्या टीम ने दर्यापूर फाट्यावर जवळपास80 गौवंश ची सुटका केली.आणि आज चांदुर बाजार तालुक्यातील बेलोरा येथील बजरंग दल चे कार्यकर्ते याना गुप्त माहिती मिळाली की वातोंडा मार्गे चांदुर बाजार येथे जनावर यांची वाहतूक होत आहे.

पूर्व नियोजन करून त्यांनी आज दिनांक 15 फ्रेब्रुवारी दुपारी 3 च्या सुमारास चिंचोली काळे मार्गे येत असलेले एकूण 6 पिकअप गाड्या अडवून त्याची झळती घेतल्यास त्या मध्ये गौवंश अत्यंत निर्दयी पणे कोंबले होते.ही जनावरे कत्तलीसाठी जात असल्याचा संशय आल्याने बजरंग दल कार्यकर्ते यांनी चांदुर बाजार चे ठाणेदार अजय आकरे याना संपर्क केला.ठाणेदार अजय आकरे यांनी आपली टीम पाठवून सर्व गाड्या या पोलीस स्टेशन चांदुर बाजार येथे लावण्यात आल्या.

वाहनचालक याना विचारणा केली असता त्यांच्या कडे मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या पावती निघाल्याने चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तर मिळालेल्या पावती वरून अवैध गौवंश तस्करी मागील मोठे रॅकेट उजेडात येणार हे नक्की.मात्र मध्यप्रदेश मधून ही वाहतूक होत असल्याने या गोष्टीचे गांभीर्याने संबंधित विभागाने लक्षात घेतले पाहिजे.

सदर कार्यवाही चा तपास ठाणेदार अजय आकरे पोलिस उपनिरीक्षक आशिष चौधरी,पंकज फाटे,मंगेश मस्के,अरविंद गावंडे,सुशील धवसे, दत्ता वानखडे सचिन डुकरे करीत आहे.

प्रतिक्रिया:-


*”आम्ही सर्व जनावरे याची चौकशी सुरू असून तपास सुरू आहे .मोर्शी येथील बाजार समिती मधील पावती मिळाली असल्याने सर्व बाबीची चौकशी केली जाईल. जर पावत्या संशयित किंवा खोट्या असल्या तरी नक्की गुन्हा दाखल केला जाईल. आणि या मागील मोठे रॅकेट लवकरच उजेडात आणले जाईल.”*
अजय आकरे ठाणेदार चांदुर बाजार पोलिस स्टेशन