अबबबब…. तिसऱ्यांदाही एकाच ठिकाणावरून गेली केबल चोरी – चोरीचा सुगावा लावण्यात चांदूर रेल्वे पोलीस अपयशी

0
563
Google search engine
Google search engine

अपयशी पोलीस प्रशासनामुळे तुळजापुरातील केबल सेवा ठप्प

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 

    चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनंतर्गत येणाऱ्या विरूळ मार्गे धामणगाव रेल्वे रोडवरील केबल चोरीचे सत्र सुरूच असुन तिसऱ्यांदा याच मार्गावरील केबल चोरी गेल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे. चोरीचा सुगावा लागण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत असुन यामुळे तुळजापुर, शिरजगाव येथील केबल सेवा ठप्प पडली आहे.

     मनोरंजनाचे जाळे सगळीकडे पसरले असुन चांदूर रेल्वे तालुक्यातील घराघरात केबल नेटवर्कच्या माध्यमातुन मनोरंजनाचे साधन पोहचलेले आहे. परंतु आता चांदूर रेल्वे तालुकावासीयांना केबल नेटवर्कच्या माध्यमातुन मनोरंजनाची सेवा केबल ऑपरेटर ला देणे कठीण झालेले दिसत आहे. कारण चांदूर रेल्वे शहरातुन आजुबाजुच्या खेड्यामध्ये ओव्हरहेड केबलच्या माध्यमातुन केबल नेटवर्क पोहचलेले आहेत. परंतु याच केबल चोरीचे सत्र चांदूर रेल्वे परिसरात धडाक्यात सुरू आहे. यापुर्वी दोन वेळा केबल चोरी गेल्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा धामणगाव मार्गावरील चांदूर रेल्वे ते शिरजगाव (कोरडे) रस्त्यावरील १८०० मीटरचा केबल अंदाजे किंमत २० हजार रूपये शनिवारच्या मध्यरात्री अज्ञात आरोपीने चोरून नेला. या घटनेबद्दल केबल ऑपरेटर यांनी रविवारी सकाळी लेखी तक्रार देऊन चांदूर रेल्वे पोलीसांना माहिती दिली आहे. मात्र या केबल चोरीचा छडा लावण्यात चांदूर रेल्वे पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे. अशा चोरीच्या प्रकारामुळे तुळजापुर, शिरजगाव (कोरडे) या ग्रामिण भागातील केबल नेटवर्क बंद झाले असुन पोलीस प्रशासनाबद्दल तालुक्यात रोष दिसत आहे.

सारख्याच व्यवसायातील आहे आरोपी ?

एक नाही दोन नाही तर चक्क तिसऱ्यांदा एकाच ठिकाणावरून सदर आरोपी केबल चोरी करत असुन तिन्ही चोरीतील आरोपी एकच असण्याची शक्यता आहे. सदर आरोपी धामणगाव रेल्वे किंवा चांदूर रेल्वे येथील सारख्याच व्यवसायातील असण्याची चर्चा शहरात ऐकावयास मिळत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आता कोणत्या दिशेने तपास करणार ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोपी सापडत नसल्याने घेतली होती सही

काही दिवसांपुर्वी यापुर्वीच्या केबल चोरीच्या घटनेतील आरोपी चांदूर रेल्वे पोलीसांना सापडले नसुन सदर आरोपी सापडत नसल्याने चौकशी बंद केल्यामुळे फिर्यादीकडून पोलीसांनी सही नेली होती. परंतु याही नंतर एकाच मालकाची एकाच ठिकाणावरून तिसऱ्यांदा केबल चोरी झाल्यामुळे आश्चर्यच व्यक्त करण्यात येत आहे.