*तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्याची कार्यकारणी जाहीर सर्व सामान्यच्या हक्कासाठी लढा देणार :- नवनिर्वाचित पदाधिकारी चांदुर बाजार:-बादल डकरे*

0
1298
Google search engine
Google search engine

तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्याची कार्यकारणी जाहीर
सर्व सामान्यच्या हक्कासाठी लढा देणार :- नवनिर्वाचित पदाधिकारी

चांदुर बाजार:-बादल डकरे
अचलपूर मतदारसंघाची चर्चा गल्ली पासून तर दिल्ली पर्यत राजकीय वर्तुळात असताना प्रत्यशात मतदार संघाचा विकास पाहता मतदार संघ विकासा पासून कोसो दूर आहे. गेल्या पंधरा वर्षांत मतदारसंघात कोणताही मोठा उद्दोग आमदारांनी आणला नसून फक्त मतदारसंघात नुसती नौटंकीच सुरू असून करोडो रुपयाच्या विकासाच्या निधीचे होल्डींग लावून कोणत्याही कामाचे स्वताच श्रेय घेऊन नागरिकाची दिशाभूल करण्याचा उद्दोग सुरू आहे. मतदारसंघात विकासाकरिता कोणताच मोठा निधी आणला नसून फक्त होल्डींग लाखो रुपये खर्च करून विकासाचा आमदारा कडून गाजावाजा केला जात आहे. यामुळे गावपातळीवर गावाचा विकास खुंटला असून विकासाला गती देण्याकरिता तालुक्यात काँग्रेसची जम्बो कार्यकारिणीचे निवड करण्यात आल्याचे बबलू देशमुख यांनी काँग्रेस मेळाव्यात कार्यकर्ताना सभोदीत करताना आपले मत व्यक्त केले.

काँग्रेस विधानसभा कार्यकारिणीच्या निवड करण्यासाठी कॉग्रेस कार्यकर्त्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख तर प्रमुख उपस्थिती बाजार समितीचे सभापती प्रमोद घुलक्षे,खविस अध्यक्ष शिवाजी बंड, बाबुराव जवंजाळ,अरविंद लंगोटे, ,भाई देशमुख,सुनीता शिरभाते,सतीश धोंडे,मुरलीधर ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रम दरम्यान चांदुर बाजार तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष किशोर देशमुख यांनी ७५कार्यकर्त्यांची तर युवक काँग्रेसची अचलपूर विधानसभा अध्यक्ष विकास सोनार यांनी ५० युवक काँग्रेसचे कार्यकर्त्यांची निवड केली तसेच चांदुर बाजार तालुक्यातील जि प सर्कलच्या अध्यक्षाची निवड करून सर्व पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन त्याचे स्वागत करण्यात आले.
सदर निवड झालेल्या तालुका काँग्रेस कमिटीच्या (ग्रामीण) पदाधिकार्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून डॉ प्रताप किटुकले,सुरेश नागपुरे,दीपक ठाकरे,विलास गांजरे,प्रकाश जवंजाळ,रहीमखा जीवनखा,ज्ञानेश्वर काळकर,दिलीप सावरकर,अनिल कोहर,योगेश विघे,सुनीता शिरभाते,सुभाष तायडे,यांची निवड करण्यात आली.सहसचिव म्हणून अनिल खडके,उमेश ठाकरे,अतुल ढोबळे,बबलू इनामदार,संजय कवीटकर,सतीश शहाणे,अवधूत मातकार,जितेंद्र इंगळे,प्रल्हाद अमझरे,किशोर सोळंके,अन्सारभाई,गजानन नांदने,हरिभाऊ शनिवरे,बाळासाहेब वाकोडे यांची निवड करण्यात आली. सचिव म्हणून शरद देशमुख,विजय राऊत,श्याम ढाकुलकर,रविंद्र वैराळे,सतीश मोहोर, पंकज कडू,देवेन्द्र रेखाते,हरीश ढोले,मंगेश ठाकरे,मकसूदखा, उमेश ठाकरे,सुधीर वानखडे,मारुती राऊत,शेख अब्दुल शेख भुरु,प्रमोद चौधरी,अ जफिर अ जाफर,यांची नियुक्ती करण्यात आली. संघटन सचिव म्हणून शिवाजी काळे,संदीप लाडोळे,प्रशांत भुस्कुटे,अब्दुल हाफिज,पंकज नेहारे,प्रमोद शेळके,गजानन अघाडे,सतीश राजस,नंदू भोयर,सुधाकर धनसांंडे, प्रदीप काळे,नरेंद्र दाभने,सचिन हिवराळे, सुरेश अकोलकर,ऍड अतुल कडू,प्रदीप सायरे यांची निवड करण्यात आली तर महासचिव म्हणून संजय गुर्जर, रावसाहेब भेटाळू,उमेश बगणे,नंदू कोठाळे, मंगेश देशमुख,ताराचंद घुलक्षे,मिलिंद मुंदाने,संतोष साऊरकर,बाळासाहेब साबळे,कदिरखा पठाण,गजानन मानकर,अनिल उल्हे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच कोषाध्यक्ष म्हणून नरेंद्र झटाले यांची निवड करण्यात आली आहे.