अखेर पालकमंत्री प्रवीण पोटे  यांनी दिला अमरावती करांना न्याय-लढा संघटनेच्या संजय देशमुख यांच्या आंदोलनाला यश

0
1000
Google search engine
Google search engine

Amravati :-
अमरावती विभागीय क्रीडा संकुल मध्ये गोरगरीब सर्वसामान्य आणि वृद्धांना तिथे व्यायाम करण्या साठी १००/- आकारणी करण्यात येत होती. त्या संदर्भात लढा संघटने चे अध्यक्ष संजय देशमुख यांनी जोरदार आवाज उठविला होता आणि ठिय्या आंदोलन देखील केले होते तेंव्हा काही महिन्या साठी ही वसुली बंद केली होती,परंतु नंतर पुन्हा वसुली सुरू केली.
मग लढा संघटनेने मा पालकमंत्री यांच्या कडे ही बाब ठळक पणे मांडली आणि यांनी विभागीय आयुक्त यांच्या कडे क्रीडा संकुल संदर्भात बैठक देखील लावली. त्या बैठकीत १००/- वसूल करण्याचे कुठलेही आदेश मा पालकमंत्री महोदयांनी दिले नव्हते तरीही, विभागीय क्रीडा संकुल च्या कार्यलयातून चुकीची बातमी छापण्यात आली होती की *मा. पालकमंत्री महोदयांनी १००/- वसुलीला दिला हिरवा कंदील.* त्या वर लढा संघटनेने आक्षेप नोंदविला आणि पालकमंत्री महोद्याकडे तशी तक्रार देखील दिली. लढा संघटनेच्या तक्रारींवर आज मा पालकमंत्री महोदयांनी १००/- वसूल न करण्याचे आदेश आयुक्तांना दिले.