ज्ञान हे जेवढे प्राचीन असेल तेवढं ते तपसिद्ध – गोभक्त राधाकृष्णजी महाराज

0
1073
Google search engine
Google search engine

आकोट/प्रतिनीधी
अन्न शिजवल्यावर काही तासांनीच खराब होते, गाईचे तूप जेवढे जुने तेवढे लाभदायक ठरते तसेच आपले प्राचीन आहे ते
तेवढं तपसिद्ध कारण ते वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या नुसतच प्रवाही नव्हे तर तिची चिकित्सा होऊन प्रसारित झालेलं असते असा कथा उपदेश गोभक्त श्री राधाकृष्ण महाराज जोधपुर वासी यांनी केला ते शांतीवन अमृत तीर्थावर प्रगट दिन महोत्सवानिमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथेचे दुसरे पुष्प गुंफताना बोलत होते .

यावेळी त्यांनी माता-पुत्र गुरु शिष्य भक्त ईश्वर यांच्यामधले प्रेम त्याग समर्पण याची अनेक उदाहरणे सांगितली

या संसारात दोनच राजे असे होऊन गेले जे प्रजेसाठी जगलेत एक म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राजा प्रभू श्रीराम व दुसरे स्वराज्य निर्माता राजा शिवाजी महाराज स्वतःसाठी कुटुंबासाठी कुणीही जगतो मात्र प्रजेसाठी जो जगतो प्रसंगी आपल्या प्राणाचा त्याग करतो असा राजा हा मृत्यू पश्चातही प्रजेसाठी देव ठरतो

अंतरीचा दिवा संतांच्या आशीर्वादाने प्रज्वलित होतो म्हणूनच म्हणतात साधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा ज्यावेळी अंतरीच्या ज्ञानाचा दिवा पेटतो तोही दिवाळी नी दसरा

यानंतर त्यांनी राजा परीक्षित यांचा जन्म, शुकदेव व राजा परिक्षितांशी होणाऱ्या भेटीचा प्रसंग कथन केला यावेळी परीक्षित राजांनी शुकदेवजींना आपली व्यथा सांगितली अन शुकदेवजींना त्यांना भागवत कथा.व अश्या प्रकारे भागवत कथेचा कथाप्रसाद सुरु झाला.

सुमधुर भजनांचा आनंद सत्संग …

कथे दरम्यान राधाकृष्णजी महाराज यांनी सादर केलेल्या मराठी भजने व गितांनी भक्ताःवर आनंदाचा वर्षाव होतो आहे. यावेळी सादर केलेल्या “हरी तुझ्या मुरली ने माझे मन…” या भजनाने तर कथा श्रोते व भक्त सत्संगात देहभान विसरून फेर धरत होते तर कथेच्या दुसऱ्या पुष्पाचा समारोप विठोबा रुक्माई नामसंकीर्तनाने झाला.संध्याकाळी हरिपाठ व हभप महादेव महाराज निमकंडे यांचे कीर्तन पार पडले.