अ. भा. ग्रा. पत्रकार संघाचे उद्या पासून दोन दिवसीय महाअधिवेशन – श्री गिरीष बापट करणार उद्घाटन

0
680
Google search engine
Google search engine
समारोपीय कार्यक्रमाला तीन मंत्री राहणार उपस्थित
अमरावती – ( प्रतिनीधी) 
     अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र प्रदेशचे राज्यस्तरीय पाचवे महाअधिवेशन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी या पुण्यनगरीत शुक्रवार २२ व शनिवार २३ फेब्रुवारी ला आयोजित करण्यात आला आहे.या दोन दिवसीय कार्यक्रमाला दिग्गज मंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे.
      या कार्यक्रमाचे उद्घाटन २२ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता अन्न व नागरी पुरवठा व संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट करणार असून अध्यक्षस्थानी अ.भा. गुरूदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी चे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे गुरूजी व स्वागताध्यक्ष म्हणून तिवसा विधानसभा क्षेत्राच्या आमदार यशोमतीताई ठाकूर राहणार आहे. तसेच प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. सुनील देशमुख, आमदार वीरेंद्र जगताप, पाचोराचे आमदार किशोरआप्पा पाटील, आमदार अनिल बोंडे, विधान परिषद आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार अरुण अडसड, जिल्हा परिषद अध्यक्ष  नितीन गोंडाणे, दैनिक प्रतिदिन अखबारचे संस्थापक संपादक नानक आहुजा, नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी, वैभव वानखडे, प्रताप अडसड, ठेकेदार हाजी अब्दुल हमीदभाई, गौरीताई देशमुख, हाजी रफिकसेठ जानवानी (चांदूर रेल्वे), अभिजीत बोके, रंजना पोजगे, रवींद्र पवार, हाजी अब्दुल रफिकभाई, दिलीप काळबांडे, सुनिता फिस्के, अर्चना वेरुळकर, पांडुरंग मक्रमपुरे, विद्याताई बोडखे, भास्करराव टोम्पे, विलास माहोरे, अण्णासाहेब उंदरे, यशवंत पांडे आदींची उपस्थिती राहणार आहे. यानंतर सायंकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थना, ७ वाजता भोजन अवकाश व रात्री ८ ते १० वाजता संगीत रजनी स्वर गुरुकुंजाचे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर २३ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता पत्रकारांचे प्रबोधन सत्र राहणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिल्ली येथील जेष्ठ पत्रकार वेदप्रकाश वैदिक राहणार असुन मुख्य मार्गदर्शक म्हणुन दैनिक जनमाध्यमचे संपादक प्रदिप देशपांडे, टि.व्ही. ९ मराठीचे नागपुर ब्युरो चिफ गजानन उमाटे, प्रसिध्द उद्योजक लप्पीसेठ जाजोदिया, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, ज्येष्ठ पत्रकार कुमार बोबडे, शिवराय कुळकर्णी, सकाळ जिल्हा प्रतिनिधी सुरेंद्र चापोरकर, दैनिक देशोन्नती आवृत्तीप्रमुख अमोल इंगोले उपस्थित राहणार आहे. तर दुपारी दोन वाजता समारोपीय सत्रात वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृह माहिती व प्रसारण राज्यमंत्री रणजीत पाटील, अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे, अमरावती लोकसभा खासदार आनंदराव अडसूळ, वर्धा लोकसभा खासदार रामदास तडस, आमदार रवी राणा, आमदार बच्चू कडू, प्रकाश महाराज वाघ, एसडीओ विनोद शिरभाते, माजी आमदार सागर मेघे, उद्योजक दिलीप गिरासे, दिलीप निंभोरकर, दिनेशनाना वानखडे आदी उपस्थित राहणार आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांनी कोणत्याही संघटनेचा भेदभाव न ठेवता पत्रकारांच्या हक्कासाठी सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन अ. भा. पत्रकार संघटनेचे मनोहर सुने, मधुसूदन कुलथे, सुरेश सवळे, कैलासबापु देशमुख, अशोक पवार, वसंतराव कुळकर्णी, युसूफ खान, राजेंद्र भुरे, अशोकचंद्र राठी, प्रा.रवींद्र मेंढे  बाळासाहेब सोरगिवकर, गुड्डू शर्मा, सुरज दहाट, सौ. जोशिला पगारिया, वनिता बोराडे,  दशरथ जाधव, मदन भाटे, भगवान सोनार, राजलता बागडी, प्रभाकर भगोले, राजेंद्र माळवे, नरेंद्र कदम, डॉ. अनिल सिरसाट अभिमन्यू भगत, अशोक वस्तानी, अनिल पालीवाल  हफीज भगवान, सुनिताताई कसबे, राजेंद्र बिरला, आबा सूर्यवंशी, प्रकाश नगरे, पवन बैस, अॅड. नवनित जोजारे, शेख ख्याजाभाई, श्रीकृष्ण पहुरकर, डॉ. हम्मद, गणेश वाघमारे, सै. शकील, रविंद्र पवार यांच्यासह अनेकांनी केले आहे.