कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरु

0
917
Google search engine
Google search engine

पाटण /प्रतिनिधी
कोयना प्रकल्पग्रस्त हे छ. शिवाजी महाराजांचे शूरवीर मावळे आहेत, कोयना प्रकल्पग्रस्तांचे राज्यभर सुरू असलेले ठिय्या आंदोलन हे शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याप्रमाणे कोयनेसह राज्यभर सुरू आहे, शिवरायांच्या स्वराज्यात सर्व सामान्य जनतेला न्याय मिळत होता, पण गेल्या वर्षी कोयनेत 23 दिवस व सातारा येथे 4 दिवस व आता कोयनानगर येथे गेले 8 दिवस कोयना प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरूच असून जिल्हा प्रशासन अजुनही झोपेचे सोंग घेऊन आहे, आताच्या सरकार न्याय देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे अशी खंत कोयना प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली .
कोयनानगर ता पाटण येथे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच असून मंगळवारी 8 व्या दिवशी आंदोलन स्थळी प्रकल्पग्रस्त जनतेने शिवजयंती साजरी केली,
यावेळी शिवरायांना अभिवादन करून शंभर टक्के विकसनशील पुनर्वसन झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी शपथ यावेळी हजारो प्रकल्पग्रस्तांनी घेतली, कोयनेचे प्रकल्पग्रस्त भुमीपुत्र आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करत असुन लाँगमार्च काढून कोयना प्रकल्पग्रस्तांसह राज्यभरातील 9 जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने आंदोलनात बसलेले हजारो धरणग्रस्त, अभयारण्यग्रस्त, दुष्काळग्रस्त जनतेचे वादळ येत्या काही दिवसांत मुंबईच्या दिशेने पायी चालत मंत्रालयावर धडकेल, व हे सरकारला जड जाईल असा इशारा यावेळी कोयना प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.

रिपोटर:सागर पाटील-पाटण