वेळापूर अकलूज येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

0
650
Google search engine
Google search engine

वेळापूर अकलूज येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सोलापूर :- अमीर मुलाणी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वेळापूर अकलूज येथे उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी भगव्या पताका लावून आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी दलित महासंघाच्या पच्छिम महाराष्ट्राच्या अध्यक्ष मा.नगमाताई शिवपाल व मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या प्रसंगी दलित महासंघाच्या पच्छिम महाराष्ट्राच्या अध्यक्ष मा.नगमाताई शिवपाल यांनी सांगितले की, मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज सर्वसमावेशक, सहिष्णु राजा म्हणून सर्वत्र वंदिले जातात. शत्रूंविरूध्द लढण्यासाठी विविध युध्दनितीचा वापर त्यांनी केला. प्रतिकुल परिस्थितीत जनतेचे हित लक्षात घेऊन उत्तम शासन म्हणून कार्य पार पाडले आहे असे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. ते आदर्श शासनकर्ते व सहिष्णू राजा म्हणून त्यांनी इतिहासात महत्वपूर्ण ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्याचा सर्वांनी आदर्श घ्यावा असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी वेळापूर पोलीस उपनिरीक्षक श्री.मागवे साहेब, आव्हे गावचे सरपंच बिंटु(नाना)करवर, दताभाऊ नाईकनवरे, हरि शिवपालक, मुन्ना चौधरी, संपतराव पाटील, तंटामुक्त समीती अध्यक्ष दत्ता उपासे,
रावसाहेब कांबळे, दत्ता(आबा)ननवरे, भिकु मिस्कर, हरिदास जगताप, सुरेश बनसोडे, संजय नाईकनवरे, नितीन नाईकनवरे, रामा नाईकनवरे, दादा नाईकनवरे, गुरू नाईकनवरे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.