आमरण उपोषणाकडे समाज कल्याण विभागाचा काना डोळा

0
605
Google search engine
Google search engine

उपोषणाचा 4 था दिवस ; आमरण उपोषणाकडे समाज कल्याण विभागाचा काना डोळा

उपोषण कर्त्याची तब्येत खालावली

उस्मानाबाद / प्रतिनिधी – महाराष्ट्रातील केवळ उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा 2010 पासून अध्याप वाहन भत्ता बंद करण्यात आल्यामुळे उपोषण करते श्री सतीश कुंभार यांना विद्यमान मंत्री माननीय सुभाष देशमुख ,शिक्षक आमदार विक्रम काळे ,माजी मंत्री आमदार राणाजगजित सिंह पाटील ,माजी आमदार ओमराजे निंबाळकर , पदवीधर आमदार सतीश चव्हाण आदींनी संबंधित मंत्री व अधिनस्त कार्यालयांना पत्रे निवेदने दिली आहेत तरीही त्या पत्रांना कचराकुंडी दाखवून दुर्लक्ष केले . सबब बंद केलेला वाहन भत्ता पुर्ववत मिळावा व अन्याय दूर करावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सतीश कुंभार हे शिंगोली आश्रम शाळा शिक्षक दिनांक 20 /2 /2019 पासून आमरण उपोषणास बसले आहेत.आरोग्य विभागाचे कोणीही प्रकृतिचि तपासणी करण्यास आले नाहीत. सम्बंधित विभागाच्या अधिकार्यांनी या उपोषणकड़े काना डोळा केला आहे. उपोषणास कास्ट्राईब महासंघाचे हरीभाऊ बनसोडे ,चंद्रकांत माळाळे, उत्तम पवळ व मराठवाडा शिक्षक संघाचे नेते व्ही .जी. पवार यांनी सक्रिय पाठिंबा व सहभाग दिला आहे.

सदर उपोशानामध्ये कचराकुंडीत निवेदने , शिफारशी टाकलेला ब्यानर सर्वांचे लक्ष वेधत आहे .