ग्रामिण भागातील नागरिकांना न्याय देण्याचे काम पत्रकार करतो – गजानन उमाटे

0
842
Google search engine
Google search engine

मोझरी येथे अ. भा. ग्रा. पत्रकार संघाचे महाअधिवेशन

पत्रकारांचे प्रबोधन सत्र

अमरावती – (शहेजाद  खान) 
    देशातील ५५ टक्के जनता ग्रामिण भागात राहते. या ग्रामिण भागातील नागरिकांना न्याय देण्याचं कामं ग्रामिण भागातील पत्रकार करतो. ग्रामिण पत्रकारांसाठी हक्काची लढाई शहरातील पत्रकार लढणार की नाही हे माहित नाही. कारण ज्यांना बटाटे वर लागतात की जमिनीत, डवरणी – पेरणी यांच्यातील फरक माहित नाही, ज्यांना कापसाचं अर्थशास्त्र माहित नाही ते ग्रामिण भागातील शेतकऱ्यांचे, जनतेचे प्रश्न काय मांडणार असे तडकफडक व्यक्तव्य नागपुर येथील टीव्ही ९ चे ब्युरो चिफ गजानन उमाटे यांनी केले. ते अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील गुरूकुंज मोझरी येथील अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाच्या अधिवेशनातील पत्रकारांच्या प्रबोधन सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बोलत होते.
     ते पुढे बोलतांना म्हणाले की, शहरातील पत्रकार ग्रामिण भागातील समस्यांना न्याय देतील याची अपेक्षा सुध्दा नाही. कारण मोठ्या शहरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यु झाल्यास मोठी बातमी येते. मात्र तेवढीच व्हॅल्यु शेतकऱ्याची आत्महत्या झालेल्या बातमीला मिळत नाही. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की ती बातमी सुध्दा तेवढीच आली पाहिजे. विदर्भ, मराठवाडा भागातील जे शेतकरी कापूस पिकवीतात त्याच कापसापासुन वेगवेगळ्या डिसाईनचे कपडे मॉडेल तयार करतो. आणि त्याचा फॅशन शो मुंबई सारख्या शहरात होतो. त्या शो ची बातमी कव्हर करण्याकरीता १०० – १५० कॅमेरे लागतात. परंतु त्याच उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याची बातमी कव्हर करायला टी. व्ही. चा एकही कॅमेरा जात नाही ही शोकांतीकाच म्हणावी लागेल. त्यामुळे तुमची – आमची जबाबदारी आहे की, आपल्या बापाचं मरण व्यर्थ जाणार नाही. ग्रामिण पत्रकारिता खुप कठीन काम आहे. परंतु तेवढीच चांगली संधी सुध्दा आपल्यासाठी आहे. सुरूवातीला घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून आपण आपली पत्रकारीता केली पाहिजे असे प्रतिपादन गजानन उमाटे यांनी केले. शनिवारी सकाळी आयोजित पत्रकारांच्या प्रबोधन सत्राच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे केंद्रिय अध्यक्ष मनोहर सुने हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन टी.व्ही. ९ चे नागपुर ब्युरो चिफ गजानन उमाटे, जेष्ठ पत्रकार कुमार बोबडे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणुन कार्याध्यक्ष मधुसुधन कुलथे, प्रदेशाध्यक्ष कैलासबापु देशमुख, वसंतराव कुळकर्णी, रविंद्र मेंढे, नरेंद्र कदम, वनिता बोराडे आदींची मंचावर उपस्थिती होती. यादरम्यान सरपंच राहुल उके, सरपंच विनय गोटफोडे व कांचन बारबुध्दे यांचा सत्कार घेण्यात आला. जेष्ठ पत्रकार कुमार बोबडे यांनी या प्रबोधन सत्रात पत्रकारांच्या विविध समस्या, त्यांना होणारे त्रास, ग्रामीण भागातील पत्रकारिता व शहरी पत्रकारीता यातील फरकही त्यांनी मांडला. पत्रकारितेतील पत्रकारांना येणारे वाईट अनुभव व त्यांनी केलेल्या २५ वर्षाच्या कारकिर्दीत आलेले अनुभवही त्यांनी बोलून दाखविले. कार्यक्रमाचे संचालन अरविंद राठोड यांनी तर आभार प्रदर्शन अमोल गवळी यांनी केले.
      यावेळी पत्रकार संघाचे युसुफ खान, बाळासाहेब सोरगिवकर, अशोक पवार, राजेंद्र भुरे, अशोक राठी, 
अमोल गवळी, सुरज दहाट, सचिन ढोक, स्वप्निल उमप, हेमंत निखाडे, राजेश सराफी, जयंत निखाडे, जानराव मनोहर, डॉ. मेघराज कोचर, इरफान पठान, प्रशिक मकेश्वर, धिरज नेवारे, विनय गोटफोडे, शहेजाद खान, मनिष खुने, मंगेश बोबडे, सागर सवळे, डॉ. अनिस सिरसाट, अभिमन्यु भगत, भगवान सोनार, पवन बैस, जोशीला पगारीया, राजलता बागडी, विजय क्षीरसागर यांसह राज्यातील अनेक पत्रकारांची उपस्थिती होती.