मने सुसंस्कारित करण्यासाठी साहित्याचे प्रचंड वाचन करावे— प्रा.राजा जगताप

0
564
Google search engine
Google search engine

मने सुसंस्कारित करण्यासाठी साहित्याचे प्रचंड वाचन करावे— प्रा.राजा जगताप

उस्मानाबाद दि.२६
आजच्या विद्यार्थिनींच्या हातात मोबाईल आला आहे त्यामुळे वाचन कमी झाले आहे.आपण परिक्षेसाठी मार्क मिळवण्यासाठी वाचन करतो आणि परीक्षार्थी बनतो.वाचन कमी झाल्याने आपल्या व्ह्यवारातील ज्ञानात भर पडत नाही.आज समाजात नैराश्य आहे.मुलीकडे आजही परक्याचं धन म्हणूनच पाहिलं जात आहे.आपण सगळ्या महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहात.पारंपरिकपणे जे आपल्या वाट्याला आला आहे.ते बदलावयाचं असेल व स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल आणि स्वत:चं अस्तित्व टिकवायचे असेल तर अभ्यासाबरोबरच साहित्याचे प्रचंड वाचन करावे व मनाला सुस्कारित करून घ्यावे.असे प्रतिपादन प्रा.राजा जगताप (मराठी विभाग आर.पी.काॅलेज)यांनी “मराठी भाषा सप्ताह व मराठी राजभाषा दिनानिमित्त” येथील व्ही.जे.शिंदे महिला महाविद्यालयात, आयोजित केलेल्या व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून आज संपनान झालेल्या उपक्रमात केले आहे.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.माधवराव शिंदे होते.यावेळी प्रा.अविनाश ताटे (मराठी विभाग प्रमुख )उपस्थित होते.
प्रारंभी थोर साहित्यिक,कवी वि.वा.शिरवाडकर यांचे प्रतिमेचे पुजन मान्यवरांनी केले.
पुढे बोलतांना प्रा.राजा जगताप म्हणाले की,आपण सगळ्या ग्रामीण भागातील मुली आहात.शिकत आसतांनाच एक ध्येय ठेवा .आपल्याला प्रेरणा घ्यायची असेल तर मराठी साहित्यातील आत्मकथनं वाचा.अनेक लेखकांनी परिस्थितीवर मात करून स्वत:ला सिध्द केलं त्यांची आत्मकथनं बलुतं,उपरा,बि—हाड,कोल्हाट्याचं पोर,झोंबी,गोतावळा,विभावरी शिरूरकर,प्रीया तेंडूलकर यांचं साहित्य वाचा त्यातूनच तुमची मने सुस्कारित बनतील.वि.वा.शिरवाडकर यांची “स्वातंञ्य देवतीची वीनवणी” ,”कणा”, या कविता ,नटसम्राट या कविता व नाटक वाचा तुम्हाला या वाचनातून प्रेरणाच मिळतील .आपण मुलींनी आईवडीलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेऊन प्रचंड वाचन करून स्वत:च्या पायावर ऊभे राहा व धाडसी बना असे शेवटी त्यांनी आवाहन केले.
प्रास्ताविक करताना प्रा.अविनाश ताटे म्हणाले की ,या सप्ताहात विविध स्पर्धा आम्ही घेतल्या व मराठी भाषेचा गौरव केला. मराठी भाषेविषयी आम्ही अनेक उपक्रम राबवले.चांगला प्रतिसाद मिळाला.अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डाॅ.माधवराव शिंदे म्हणाले की,आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात औद्योगिकीकर नाही.त्यामुळे शिक्षणाशिवाय येथल्या मुलींना पर्याय नाही.आज महिलांच्या अनेक समस्या आहेत.मुलींना मुलाच्या तुलनेत कमी लेखले जाते आहे याचा राग मुलींनी अभ्यासावर काढावा व भविष्यात स्वत:च्या पायावर उभारण्यासाठी अभ्यास करावा व जीवनात मोठे.व्हाॅवे.