कर्मचाऱ्यांचे पाय धुण्यापेक्षा सेवेत कायम समायोजन करा – शाहरुख मुलाणी- म. रा. कंत्राटी कर्मचारी महासंघाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कडे साकडे

0
971
Google search engine
Google search engine
मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – देशात तसेच राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी सफाई कामगार स्वच्छतादूत म्हणून देशाची स्वच्छता करत आहेत त्यांना आधी सेवेत कायम समायोजन करावे अशी लेखी मागणी ई-मेल द्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कडे म. रा. कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी केली आहे.
महासंघाचे मंत्रालयीन सचिव मुलाणी म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनांतर्गत “ स्वच्छ भारत अभियान ” सुरु केले आणि दिल्ली पासून गल्ली पर्यंत सर्वत्र लोक हातात झाडू घेऊन स्वच्छता करत आहेत. इतर देशाप्रमाणे आपल्या देशात स्वच्छता व्हावी हि सर्वांची भावना आहे. संत गाडगेबाबा यांनी सुद्धा स्वच्छतेचा संदेश दिला. कंत्राटी सफाई कामगारांना यांना नोकरी ची कोणतीही प्रकारचे हमी नाही. कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय सुविधा नाहीत. तरी सुद्धा कंत्राटी सफाई कामगार गटर, नाले आदी घाणीत उतरून स्वच्छता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. घरातील कचरा डम्पिंग ग्राऊंड पर्यंत घेऊन जाण्यात याच कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सफाई कामगारांचे पाय धुवून सम्मान व सत्कार केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद ! परंतू, देशात तसेच प्रामुख्याने राज्यात मंत्रालय ते ग्रामपंचायत पर्यंत त्यात विविध महानगरपालिका, नगरपरिषदा आदीं मध्ये सर्वत्र स्वच्छतादूत म्हणून कंत्राटी सफाई कामगार देशाची स्वच्छता करत आहेत. फक्त सफाई कामगारांचे पाय धुवून चालणार नाही तर कंत्राटी सफाई कामगार यांना आहे त्या ठिकाणी सेवेत कायम समायोजन केल्यास खरा सम्मान आणि सत्कार होईल असे मुलाणी म्हणाले.
यावेळी कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष तथा याचिकाकर्ते मुकुंद जाधवर, सरचिटणीस शहाजी नलवडे, कार्याध्यक्ष सचिव जाधव, कोषाध्यक्ष विकास डेकाटे, राज्य सचिव बाबासाहेब कोकाटे, मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी, प्रवक्ते भगवान भगत आदी उपस्थित होते.