संत गाडगे महाराज जयंतीनिमित्य ‘रोटी डे’ साजरा – साहस जनहितकारी संस्थेचा उपक्रम

0
577
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
    साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्था व गुरुदेव कलोपासक सेवा मंडळ चादूर रेल्वे  याच्या तर्फे श्री संत गाडगे महाराज यांच्या १४३ वी जयंती निमित्य रोटी डे म्हणुन साजरा करण्यात आला. यामध्ये  रेल्वे स्टेशन, बस स्टँड, ग्रामीण रूग्णालय तसेच चांदूर रेल्वे परिसरातील अत्यंत गरजू लोकांना अन्नदान (जेवण )आणि कपडे वाटप करण्यात आले.
     यावेळी ठाणेदार ब्रम्हदेव शेळके ,संग्राम क्षीरसागर, चेतन भोले ,भूषण शेळके, ऋषिकेश शेळके, कुलदीप मसराम, संजय  शिंदे, सागर क्षीरसागर, कपिल धामऩणकर, श्रीकांत मोधड़े, नवीनचंद्र खंडेतीया, प्रतापराव खंडार, प्रकाश चवाळे, विजया चवाळे, तिवारी, विजयराव काळसर्फे, अनिल चौधरी,अमोल राउत, नीलेश तांडेकर, राजेश राउत, आकाश वानखडे आदींची उपस्थिती होती.