स्व. मुंधडा महाविद्यालयात ‘हेल्थ अँड हॅप्पीनेस’ शिबिर – आर्ट ऑफ लिविंग, चांदूर रेल्वे चे आयोजन

0
629
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (Shahjad Khan)

    स्व. मदनगोपाल मुंधडा महाविद्यालयात चांदूर रेल्वे येथिल आर्ट ऑफ लिविंगच्या वतीने हेल्थ अँड हॅप्पीनेस शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक निलेश कापसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

     सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत कारमोरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा विभाग प्रमुख डॉ. अलका करणवाल यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना निलेश कापसे यांनी म्हटले की, गुरुदेव श्री श्री रविशंकरजी  यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था १९८१ मध्ये स्थापन केली. आर्ट ऑफ लिव्हिंग ही एक शैक्षणिक व मानवहितकारी चळवळ आहे, जी तणावमुक्ती आणि सेवा उपक्रमांमध्ये अविरत कार्यरत आहे. ही संस्था जागतिक स्थरावर १५२ पेक्षा देशांमध्ये सक्रिय असून त्यांनी करोडो लोकांच्या आयुष्यात बदल घडवला आहे. “जोपर्यंत आपले मन तणावमुक्त आणि समाज हिंसा मुक्त होत नाही, तो पर्यंत आपल्याला विश्व शांती मिळविता येणार नाही”, या श्री श्रींच्या शांतता तत्वाला अनुसरून सर्व कार्यक्रमांना दिशा मिळते. प्रत्येक व्यक्तीला तणावापासून मुक्ती आणि मन:शांती अनुभवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगने तणावमुक्तीचे कार्यक्रम सुरु केले आहेत. यात श्वसन प्रक्रियेसह ध्यान आणि योगासनांचा समावेश आहे. या कार्यक्रमांमुळे जगभरातील कोट्यावधी लोकांना तणाव, नैराश्य आणि हिंसक मनोवृत्तीतून बाहेर पडण्यास मदत होते असे मत निलेश कापसे यांनी म्हटले. सदर कार्यक्रमासाठी प्राचार्य कारमोरे यांच्या मार्गदर्शनात डॉ. अलका करणवाल यांच्यासह इतर प्राध्यापक, कर्मचारीवृंद यांचे सहकार्य लाभले. यावेळी अनेक विद्यार्थी उपस्थित होते.